वारकरी सेवा ही खरी ईश्वरीय सेवा आणि ऊर्जा – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : पांडुरंगाच्या भेटीसाठी मोठ्या भक्तीभावाने पायी दिंडीने निघालेल्या जनसामान्य वारकरी यांना सेवा-सुविधा देण्याचे ईश्वरीय कार्य नारायणशेठ अग्रवाल व त्यांचा परिवार करत असल्याचे मनोगत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

महान तपस्वी कैकाडी बाबा व ह. भ. प. कोंडीराम काका यांचा आनंदपुरी (मनमाड) ते पंढरपूर मार्गस्त असलेल्या दिंडीचा मुक्काम कोपरगांवात दिंडीचे स्वागताध्यक्ष नारायण अग्रवाल यांचे निवास आणि कृष्णाई बँक्वेट हॉल येथे होता.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आणि मान्यवर म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, ह.भ.प. भारत महाराज जाधव, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत,अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रोठे, मुख्याधिकारी सुहास जगताप,नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, मंडलाधिकारी मच्छिंद्र पोकळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. गायत्री कांडेकर, डॉ. प्रियंका मुळे, डॉ. संकेत मुळे, डॉ. नरेंद्र भट्टड, डॉ. डी. एस. मुळे, डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, कैलास ठोळे, धर्मयोध्दा भिमराव बडदे प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका भाग्यश्री बडदे, रामू  पटेल, माधवराव देशमुख,

अरविंद भन्साळी, नारायण अग्रवाल, सुषमा अग्रवाल, विरेश अग्रवाल, पुजा अग्रवाल, सुशांत घोडके, जिजाऊ महिला मंडळाच्या विजया देवकर, विमल पुंडे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव,अभिजीत शहा, प्रसाद नाईक, बबलू वाणी, सुधीर डागा, दिलीप  कोल्हे, जनार्दन कदम, प्रदीप साखरे, विलास वालझडे, अशोक लकारे, राजेंद्र सालकर, विनोद राक्षे, पप्पू पडियार, योगेश जोबनपुत्रा, विशाल आढाव, राकेश काले, सतीश रानोडे, सुजल चंदनशिव, गोरख देवडे, संजय खरोटे, जितेंद्र गंगवाल,

सनी वाघ, दीपकराव विसपुते, संतोष भट्टड, सुनील फंड, आदिनाथ ढाकणे, शैलेश अग्रवाल, किशोर बजाज, विजय बंब, सुधाताई ठोळे, नानासाहेब सिनगर, विशाल अग्रवाल, मनोज अग्रवाल, दिपक अग्रवाल व कोपरगावातील व्यापारी वर्ग, वारकरी मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडीचे आगमन नारायण अग्रवाल यांचे निवासस्थानी झालेवर तेथे पुजा आरती करुन संतांचे अभंग टाळ मृदुंगाच्या गजरात गायन झाले. ईस्काॅनचे भक्त मंडळ मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले होते.

प्रमुख अतिथी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना मानाची वारकरी पगडी, शेला, तुळशी हार देवून सन्मान करण्यात आला. ४७ वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीचे ३२ वर्षापासून प्रसिद्ध व्यापारी नारायण अग्रवाल हे वारकरी यांची भोजन, निवास सुविधा उपलब्ध करुन देत विविध वस्तुंचे वाटप करतात. या वर्षीही वारक-यांना प्रवासी बॅगचे वितरण करण्यात आले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने वारक-यांना रोटरीची शिदोरी म्हणून लोणचे, ठेचा पदार्थ देण्यात आले.

या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करून देत दिंडीसाठी निघालेल्या सर्व वारकरी बांधवांची वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करुन दिली होती. उपस्थितांचे स्वागत नारायण अग्रवाल यांनी तर सुत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले. शेवटी आभार योगेश जोबनपुत्रा व विरेश अग्रवाल यांनी मानले.

या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करून देत दिंडीसाठी निघालेल्या सर्व वारकरी बांधवांची वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

Leave a Reply