मुसळधार पावसाने कोपरगाव तालुका जलमय

वारी येथे बाजार समितीचे माजी सभापतीसह ६ जन अडकले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव तिलुक्यात शनिवारी राञी पासुन रविवारी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला. उभे पिके आडवी झाली तर वारी येथील पुराच्या पाण्यात कोपरगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर निवृत्ती टेके  व त्यांच्या कुटुंबातील ६ जन अडकल्याने त्यांच्या बचावासाठी तालुक्यातील संपूर्ण यंञणा घेवून खुद्द आमदार आशुतोष काळे व तहसीलदार महेश सावंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. तालुक्यात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

 कोपरगाव तालुक्यात शनिवारी राञी ८ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. राञभर व सकाळी १२ वाजे पर्यंत सतत पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील अनेक ओढे नाल्यालांना नदीचे स्वरुप आले होते. तालुक्यातील शिंगणापुर जवळील गारद्या  नाल्याला पाणी आल्याने शिरसगाव, पडेगाव  व इतर गावांचा संपर्क तुटला होता कोपरगावडे  येणारे अनेक रस्ते पाण्यात गेल्याने रहदारी बंद झाली. शहराजवळील पुणतांबा चौफुलीला पाण्याने वेढले होते त्यामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

राञी अचानक आलेल्या पावसामुळे नेहमी प्रमाणे शहरातील खडकी भागातील नागरीकांच्या घरांनी पाणी शिरल्याने नागरीकांची धांदल उडाली ४० ते ५० घरामध्ये पावसाचे पाणी गेले होते. या भागातील नागरीकांना काळे -कोल्हे यांनी तातडीने मदतकार्य केल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. जेवण नाष्ट्याची सुविधा दोन्ही नेत्यांनी पुरवून माणुसचे दर्शन नेहमी प्रमाणे घडवले.

 दरम्यान तालुक्यातील वारी येथे जोरदार पावसाच्या पाण्याने कोळ नदीला पुर आला अशातच जवळच असलेल्या ओढ्याला भरपूर पाणी आले दोन्ही पाण्याचा फुगवटा व भरल्याने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर निवृत्ती टेके व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य असे ६ जन पुराच्या पाण्यात अडकल्याचे समजताच तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी तातडीने आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धावुन गेले.

आमदार आशुतोष काळे हे स्वत: मदतीसाठी धावत चक्क तहसीलदार सावंत व आमदार काळे एक ट्रॅक्टर मध्ये बसुन टेके  कुटुंबाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेले माञ पाण्याची खोली ज्यास्त असल्याने टेके यांच्यापर्यंत पोहचु शकले नाहीत पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने ६ जनांच्या जीवाला धोका होवू शकतो त्यामुळे आमदार काळे व तहसीलदार सावंत यांनी  लष्करी दलाच्या तुकडीला बोलवून बचाव कार्य सुरु केले आहे राञी उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.

 तालुक्यातील सोनेवाडीसह अनेक गावांत पावसाचे पाणीच पाणी झाले आहे. अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सरासरी १५० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.  दरम्यान नाशिक धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. गोदावरी नदी पाञातून  ९० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळी ८ वाजता केवळ ३१ हजार क्युसेक्स पाणी गोदावरी नदीतून वाहत होते. माञ सायंकाळी तब्बल ९० हजार क्युसेक्स पाणी झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलाला पुराचे पाणी टेकल्यामुळे हा पुर रहदारीसाठी पालीका  व पोलीस प्रशासनाने बंद केला आहे. तसेच नाशिक  पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशा दिला असुन गोदावरी नदीपाञात धरणातील पाणी टप्याटप्याने  वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पावसाची संततधार  कायम राहीली तर गोदावरी नदीला मोठा पुर येण्याची शक्यता  नाकारता येत नाही. कारण नाशिक धरण परिसरातील सर्व धरणं तुडुंब भरली आहेत.  खाली जायकवाडी शंभर टक्के भरल्यामुळे पावसाचे पाणी वाढले तर  पाण्याचा विसर्ग होणे कठीण आहे त्यामुळे पुरस्थिती होवू शकते असे चित्र आहे.