कोपरगाव प्रतिनिधी, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या प्रचारार्थ कोपरगाव येथील सभेत बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकी पुर्वी विरोधक म्हणत होते की, लाडक्या बहीणींना दरमहीण्याला पैसे मिळणार नाही पण विरोधकांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष पुर्ण झाले निवडणुकीला तरीही आमच्या लाडक्या बहीणींना दरमहिण्याला थेट खात्यात पैसे देतोय.

जो पर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे देतच राहणार. केवळ बहीणींनाच मदत नाही तर आमच्या लाडक्या भावांसाठीही अनेक महत्वपूर्ण योजना राबवून मदत करीत सक्षम करतोय. शेतकऱ्यांना विज मैफत चालुच आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सोबत शेतकऱ्यांना सहा हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही निवडणुका जिकण्यापुरते आश्वासन देणारे नसुन लोकामध्ये राहून परिवर्तन घडवणारे आहोत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत परिवर्तन घडवण्याचे काम करतोय. जनमाणसांच्या विकासाची ब्लु प्रिंट आपल्याकडे तयार आहे.

आमच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भक्कम आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेत राज्याच्या विकासाचा आराखडा कोपरगावच्या सभेत सांगून शहरांच्या विकासाठी कोणकोणत्या योजना आहेत याचा आलेख मांडून तुम्ही भाजपला विजयी करा विकासाची हमी मी घेतो असे म्हणाले.

या प्रचार सभेला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधानसह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार नागरीक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करुन नगरपालीकेच्या निवडणुकीत भाजप मिञ पक्षाचीच सत्ता येणार असल्याचे सांगितले.


