विखेंना आका म्हंटले तर मी बोका – आमदार काळे

न्यायालयाने विरोधकांची याचीका फेटाळल्यावरुन चर्चा सुरु

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या रिंगणात भाजप मिञ पक्षाच्यावतीने प्रचार करताना कोल्हेंनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना आका म्हंटले पण बोका आहे असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हेवर निशाणा साधला.

 भाजप मिञ पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक उमेदवारांच्या विरोधात न्यायालयात जावून हरकत घेत उमेवारी अर्ज रद्द करण्यासाठी याचीका दाखल करण्यात आली होती. ती याचीका न्यायालयाने फेटाळत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उमेदवार अर्ज वैध ठरवून याचीका फेटाळली यावरून आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात पञकार परिषद घेवून माध्यमांना माहीती दिली. यावेळी आमदार आशुतोष काळे, काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा खोरे आढाव, त्यांचे वकील विद्यासागर शिंदे , शहर अध्यक्ष सुनिल गंगुले, विरेन बोरावके, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी काळे बोलताना पुढे म्हणाले की, विरोधकांनी न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेला जास्तवेळ दिला असता तर जनतेने त्यांचा विचार केला असता. जनतेतून विरोधकांना कौल मिळणार नाही म्हणून न्यायालयात गेले. उमेदवारी अर्जात कोणतीही ञुटी नसतानाही न्यायालयात गेले. माञ उमेदवारी अर्ज बाद करण्याचा अधिकार न्यायालयाला नसुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आहे. पराभव दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनता आपल्या पाठिमागे असल्याने  गुलाल आमचाच आहे असे म्हणत विरोधकांचे नाव न घेता  समाचार घेतला.

 यावेळी काका कोयटे म्हणाले, विरोधकांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. खोट बोल पण रेटून बोल हि विरोधकांची जूनी सवय आहे. ते न्यायालयात गेले तरी शेवटी सत्त्याचा विजय झाला. या निवडणुकीतही आमचाच विजय होणार. स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांना एक डाव शिकवला असेल पण आम्ही सुद्धा स्व. कोल्हेंच्या तालमित तयार झालोय त्यामुळे आम्हाला त्यांनी १० डाव शिकवलेत असे म्हणत कोयटेंनी कोल्हेवर निशाणा साधला. 

यावेळी अॅड विद्यासागर शिंदे यांनी न्यायालयातील बाजू सांगताना म्हणाले की, विरोधकांनी अतिशय किरकोळ कारणावरून न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात निवडणूक विभागाच्या तांञिक आडचणीच्या ञुटी होत्या. ऑनलाईन व ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरताना  झालेल्या किरकोळ ञुटी होत्या त्यात उमेदवारांचा उमेदवार अर्ज बाद होण्याचा काहीच संबध नाही. केवळ बदनाम करण्याचा डाव विरोधकांचा होता त्यामुळे न्यायालयाने विरोधकाची याचीका फेटाळली असल्याचे सांगितले. 

Leave a Reply