कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, सुप्रसिद्ध अभिनेत्री नॅशनल क्रश गिरीजा ओक आणि चला हवा येवू द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, ओंकार राऊत, प्रसाद खांडेकर, अपूर्वा गोरे आणि ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे असे गायक रोहित राऊत, गायिका राधिका भिडे हे सर्व कलाकार बुधवार (दि.१७) रोजी कोपरगाव शहरात येत आहेत. कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराबरोबरच ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रम’ या भव्य कार्यक्रमातून हे कलाकार कोपरगावकरांचे मनोरंजन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सभा, कॉर्नर सभा आणि मतदारांच्या समक्ष भेटी घेवून कोपरगावकरांपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विकासाची भूमिका, भविष्यातील विकासाचा अजेंडा आणि उमेदवारांचे विकासाचे व्हिजन पोहोचवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला आहे. आ.आशुतोष काळे यांनी मागील सहा वर्षात कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात विकासात्मक केलेले बदल नागरीकांना भावले असून राष्ट्रवादीच्या प्रचार सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विकासाची दूरदृष्टी नसलेल्या विरोधकांच्या आडमुठे धोरणामुळे निवडणूक लांबली आहे त्याचा कोपरगावकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या मनस्तापातून नागरीकांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी राजकीय प्रचाराला मनोरंजनाची जोड देत महाराष्ट्रभर आपल्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले चला हवा येवू द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कलेतून कोपरगावकरांना खळखळून हसवणार आहेत.

शनिवार (दि.२०) रोजी होणाऱ्या कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या प्रचाराला मनोरंजनाच्या माध्यमातून अधिकचा वेग देण्यासाठी ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चला हवा येवू द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, ओंकार राऊत, प्रसाद खांडेकर आणि अपूर्वा गोरे तसेच गायक रोहित राऊत,गायिका राधिका भिडे हे कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराबरोबरच कोपरगावकरांचे मनोरंजन करणार आहेत.

नॅशनल क्रश अशी ओळख मिळविलेली प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक, आणि महाराष्ट्रातील आघाडीचे विनोदी कलाकार यांचे अभिनय रंगमंचावर पाहण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगावकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या कार्यक्रमाबाबत कोपरगावकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रम’ या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी बुधवार (दि.१७) रोजी सायंकाळी ५.३० वा. कोपरगाव तहसील कार्यालय मैदानावर कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले आहे.


