निवडणुकीसाठी कोपरगावात पोलीसांचा तगडा बंदोबस्त – अमोल भारती

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोपरगाव पोलीसांनी मतदान केंद्रासह सर्वञ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे तसेच मतदान केंद्रात कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक अमोल भारती यांनी  माध्यमांशी बोलताना दिली.  यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित होते. 

पोलीस उपाधिक्षक अमोल भारती बोलताना पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार मतदान केंद्राच्या अगदी जवळ आपले बुथ लावून मोठी गर्दी करतात त्यामुळे मतदारावर दडपण येते. तसेच जवळच गर्दी झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा होण्याची शक्यता असल्याने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचने नुसार उमेदवारांचे मतदान बुथ हे मतदान केंद्राच्या दोनशे मिटर रेषेच्या पलीकडे बुथ टाकावे, उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी  शंभर मिटरच्या पलिकडे ठरलेल्या रेषेत थांबावे, उमेदवारांना मतदान केंद्रात जाता येईल माञ केवळ तीन मतदारांनी मतदान करेपर्यंत मतदान केंद्रात थांबू शकतील माञ वारंवार मतदान केंद्रात लुडबुड करता येणार नाही.

  मतदारांना ने आण करण्यासाठी असणारे वाहने हे दोनशे मिटरच्या रेषेपलीकडे थांबवावी वाहने मतदान केंद्रावर आणता येणार नाही जर कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्या राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार कारवाई करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी  पोलीस प्रशासने तब्बल चारशेपेक्षा अधिक पोलीसांची फौज सुरक्षेसाठी तैनात केली आहे.

त्यात १ अप्पर पोलीस अधिक्षक, २ पोलीस उपाधिक्षक, २५०पोलीस कर्मचारी, २५ अधिकारी १२५ होमगार्ड, एस आरपी एफ व  आरसीपीच्या दोन स्वतंत्र  तुकड्या तैनात केल्याची माहीती दिली. तसेच उमेदवार व नागरीकांना पोलीस प्रशासनाच्यावतीने शांततेचे आव्हान करण्यात आले असुन कुठेही शांतता भंग झाली तर पोलीसांशी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. 

Leave a Reply