कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या ४६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. ही परीक्षा इयत्ता ६ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माध्यमामध्ये श्रेयश भवर हयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सलग दहाव्या वर्षी आत्मा मालिकचे राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थी व शिक्षक यांच्या अथक परीश्रमातून हे यश मिळाले. आजपर्यंत या परीक्षेत २९५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा ऐतिहासिक विक्रम गुरुकुलाने केला आहे असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगीतले

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इ. ६ वी चे अथर्व कोळपे, राजवीर कालेकर, कार्तिक शेटे, भूपती चव्हाण, स्वरा चौधरी, श्रेयश कासार, योगराज पवार, आराध्य बोऱ्हाडे, यशराज बराते तसेच इ. ९ वी चे श्रेयश भवर, कृष्णा नेहे, कृष्णा लोखंडे, श्रेयश नलावडे, आरव नाणेकर, धनश पाटील, श्रीतेज इंगोले, श्लोक कदम, आयुष नवले, पृथ्वीराज टोपे, हर्षवर्धन खिंडकर, राम जाधव, चैतन्य मखमले, विश्वजीत त्र्यंबके, मयंक नाहिरे, अंकित पाटील, यश कनके, तनुष्का कोर्डे, कृष्णा किसे, आदित्य मोकाटे, सोहम मकाळ, दर्शन गिरासे देवयानी वारंगुळे, ओम कदम, आदित्य भगत, ज्ञानेश्वरी काळे, प्रणव केदार, ओम पांगरे, यश निमसे, पृथ्वीराज मोरे, अथर्व नागवडे, विज्ञानी कुंभार, वेदांत काकडे, दर्शन ओव्हाळ, पार्थ मोरे, साईश मोरे, पार्थ काळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, सचिन डांगे, पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, विषय शिक्षक सोपान शेळके, अमोल कर्डिले, अकांक्षा कळसकर, रिना पवार, अंजली तिवारी अर्थव फाऊंडेशन चे नंदकिशोर भाटे, राहुल मिश्रा, शिव्म तिवारी, प्रियान्यु कुमार, हरिष तेली, संदिप कुमार, अनुष्का कुमारी, गौरव कापडणीस, अभिलाषा उन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक, सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे, मिरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे आदीनी अभिनंदन केले आहे.


