कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रत्येक गावाला समसमान न्याय दिला आहे. विकास करतांना सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवतांना करंजी व परिसरातील विकासाचे प्रश्न सोडविले असून यापुढील काळात देखील उर्वरित विकासाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुकयातील करंजी येथे २० लक्ष रुपये निधीतून करंजी ते बोकटा (ग्रा.मा.७५) रस्ता डांबरीकरण करणे, २० लक्ष रुपये निधीतून ओगदी ते करंजी (ग्रा.मा.१७) रस्ता डांबरीकरण करणे व १९ लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळा दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम आदी कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघाचा विकास साधतांना मागील काही वर्षापूर्वी प्रलंबित असलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढला. रस्ते, पाणी, आरोग्याचे महत्वाचे प्रश्न सोडविले असून मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाला प्राधान्य दिले.
यापुढील काळात देखील विकासाचे उर्वरित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी आपण सदैव कटिबद्ध व प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कारभारी आगवण, माजी जि.प. सदस्या सौ. विमलताई आगवण, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवण, चांगदेव आगवण, सांडूभाई पठाण,गोपाल कुलकर्णी, उत्तमराव गायकवाड, एकनाथ फफाळे, सरपंच छबुराव आहेर, नामदेव भिंगारे, नारायण भारती, संदीप ढवळे, माणिकराव गायकवाड, आबासाहेब शिंदे, रमेश गुंजाळ, भाऊसाहेब गव्हाणे, पोलीस पाटील अनिल चरमळ, बळीराम जोर्वेकर, कैलास चरमळ, वसंत आरखडे, ज्ञानदेव आगवण, नारायण आगवण, संतोष आगवण, गोविंद शिंदे, मुकुंद आगवण, सोपान रहाणे, विजय गायकवाड, कारभारी भिंगारे, गणेश गायकवाड, वामनराव गायकवाड, भाऊसाहेब भिंगारे, सुदाम आगवण,
दत्तात्रय चरमळ, अंबादास आगवण, संजय थोरात, गुरुबच्चन पंजाबी, एकनाथ कापसे, नाथाजी आगवण, भाऊसाहेब फफाळे, निवृत्ती आगवण, गणेश महाले, दत्तात्रय शिंदे, संजय जाधव, जनार्दन बोर्डे, ज्ञानदेव आगवण, चांगदेव जाधव, केशव चरमळ, गवनाथ डोखे, निवृत्ती आगवण, बबनराव फफाळे, संपत ढवळे, संतोष आगवण, जावेद पठाण, सोपानराव आगवण, सुभाष गायकवाड, अशोक गुंजाळ, तुळशीदास मलिक, सोपानराव भिंगारे, एकनाथ डोखे, अशोक गायकवाड, कारभारी थेटे, मधुकर चव्हाण, एकनाथ शिंदे, बाबासाहेब शिंदे, भास्कर शहाणे,
विकी चांदर, आण्णासाहेब शिंदे, बाबुराव डोखे, भरत जगताप, कृष्णा आहेर, शिवाजी जाधव, संजय उगले, सागर कापसे, भैय्या शेख, मोहन आहेर, वामन गायकवाड, फिरोज पठाण, मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, नंदकुमारजी थोरात, ज्ञानोबा चव्हाण आदी मान्यवरांसह सप्तशृंगी मित्रमंडळ करंजीचे सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.