कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मामालीक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा आत्माविष्कार सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मीक, कलेचा आविष्कार असतो हा सहादिवशीय सोहळा म्हणजे देशविदेशातुन आलेल्या हजारो भक्तातांसह विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने आत्मामालीक संकुलाला गजबजलेल्या पंढरीचे स्वरुप आले होते. पंपु.आत्मा मालीक माऊलींच्या विचाराला अनुसरुन या ठिकाणी अध्यात्मा बरोबर विविध कलागुणांची शिकवण दिली जाते. शैक्षणिक क्षेञात अग्रभागी असलेल्या या संस्थेत राज्यासह देशाच्या कानाकैपऱ्यातून विद्यार्थी शिकत आहेत.
आत्मामालीक शैक्षणीक संकुलाचा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे अर्थात आत्माविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. सहा दिवशीय चाललेल्या कार्यक्रमाचची जय्यत तयारी आत्मामालीक ध्यानपिठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी व शैक्षणिक संकुलाचे शिक्षणाधिकारी सुधार मलीक यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात करण्यात आली. संपूर्ण शैक्षणिक संकुलाला आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगाट केले होते.
संकुलातील मुला मुलीसह त्यांच्या पालकांसाठी आत्मामालीक फुड फेस्टिव्हलचे आयोजन करुन तब्बल १२५ विविध खाद्य पदार्थांची मेजवानी देण्यात आली होती. चिञपटसृष्टीलाही लाजवेल असा भव्य रंगमंच तयार करण्यात आला होता. एकाच वेळी शेकडो कलाकार आपली कला सादर करत होते. रंगमंचावर रंगीबेरंगी विद्युत छटा लावून मोठ्या एलईडी स्क्रीनच्या सहाय्याने रंगमंचाची सुबकता अधिकच खुलुन दिसत होती. बघणाऱ्यां प्रत्येकांना आपली मुलं एक चिञपटसृष्टीतल्या रंगमंच्यावर कला सादर करत असल्याची जाणीव होत होती. या भव्यदिव्य कार्यक्रमाला दररोज विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित असल्याने कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली होती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण कलेचा सोहळा म्हणजे आत्माविष्कार होय. राज्यातल्या विविध शाळा महाविद्यालयापैकी आत्मामालीक शैक्षणीक संकुलाचे हे महासंमेलन हा सर्वात मोठे स्नेहसंमेलन असावे. १२ हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यात आली होती. याबाबत माहीती देताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब म्हणाले, सहा दिवसांच्या या संमेलनात नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत दोन हजार विद्यार्थी, संगीत स्पर्धेत दिडशे, हस्तकला स्पर्धेत चारशे तर साठ विद्यार्थी बालनाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवतील. सहा दिवसांच्या काळात तब्बल साडे नऊ हजार विद्यार्थी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर करणार आहेत.
अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाने विविध अभ्यासक्रमासह क्रीडा, अभिनय, संगीत, चित्रकला आदि क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थांना विशेष सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अभ्यासातील विविधता व उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर या संकुलात विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होत आहे. – अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर
मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे लावण्यात आल्याने तिथे विद्यार्थी व पालक आनंद घेत आहेत. आत्माविष्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी संकुलाचे दिड हजार शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. संकुलातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकला, रांगोळी, कागद तसेच मातीपासून तयार केलेल्या सुबक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आल्याने आत्माविष्काराची ऱगत अधिकच खुलली आहे. या आत्माविष्कारासाठी ओमगुरु माऊलीसह आत्मा मालिक ध्यानपिठाचे संत परमानंद महाराज, निजानंद महाराज, विवेकानंद महाराज, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जगधने, नामदेव डांगे, मयुर ढोकचौळे, संदिप गायकवाड, नितीन सोनावणे, मिना काकडे आदि प्राचार्य मंडळींचे परीश्रम आत्माविषकारासाठी लाखमोलाचे आहे.
या आत्माविष्कार स्नेहसंमेलनात सादर करण्यात येत असलेले सांस्कृतीक कार्यक्रम आणि नृत्य स्पर्धांतील स्पर्धकांना दिग्दर्शन करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत नृत्यदिग्दर्शकांना निमंत्रीत करण्यात आले होते. स्पर्धकांच्या भरजरी वेशभुषा, मोहक प्रकाश योजना आणि तालबध्द नृत्य अविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आत्मा मालीक शैक्षणिक व क्रीडा संकुल म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे आगार आहे. येथी शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आपल्या आयुष्याचा पाया मजबुत करुन यशाचे शिखर गाठत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने संपादक प्रकाश पाटील बोलताना म्हणाले, ज्ञानाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व अध्यात्माची जोड देत आत्मामालिक शैक्षणिक संकुलात देशाची भावी पिढी सक्षम घडतआहे. समाजाभिमुख कर्तुत्व गाजविणारे उद्याचे कलेक्टर, डॉक्टर, कर्नल, समाजसेवक, शिक्षक घडविणाऱ्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या वतीने आयोजित आत्माविष्कार -२०२३ या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. व्यासपीठावर शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्थ हनुमंतराव भोंगळे, उदघाटक विश्वस्त श्रीधर गायकवाड, प्रकाश भट, दै.प्रभातचे संपादक जयंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ, पुढारीचे संपादक चंद्रकांत वाकचौरे, चंदाली मुकेश बागडे, अविनाश कलापुरे, बाळासाहेब शिंगे, दीपक सरणोत, बाळासाहेब गोर्डे, विवेकानंद महाराज चांगदेव महाराज, मीरा पटेल, संत मंडळी उपस्थित होते. यावेळी देश, राज्यपातळीवर नैपुण्य प्राप्त संकुलाच्या विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थाचा पारितोषक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, आश्रमाचे विश्वस्त श्रीधर गायकवाड यांनी यावेळ मनोगत व्यक्त केले.
दोन एकराच्या संकुल परिसरात आत्माविष्कार -२०२३ अंतर्गत १२५ प्रकारच्या विविध खाद्य पदार्थांची रेलचेल यावेळी संकुलाच्या वतीने करण्यात आली होती. विशेष अतिथीसह, विद्यार्थी, पालकांनी या खाद्यपदार्थांचा यावेळी आनंद लुटला.