शेवगांव प्रतिनिधी, दि.१५ : मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये सायन्स ऑलंम्पियाड फाउंडेशन मुंबई यांनी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्लिशच्या राज्यस्तरीय स्पर्धेत शेवगांवच्या निर्मल ब्राईट प्रायमरी स्कूलच्या प्रगती प्रशांत मगर हिने गोल्ड मेडल पटकावले आहे.
प्रगती राज्यात २३४ वी तर तालुत्यात पाहिली आली आहे. यानिमित तिचा शाळेत सत्कार करण्यात आला. यासाठी तीला शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती जयश्री कदम आणि शाळा व्यवस्थापक सुनील आढाव, विषय शिक्षिका अश्विनी लोहिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. येथील सम्राट अशोकनगर मित्रमंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मगर यांची ती कन्या आहे . यां यशाबद्दल तिचे आबासाहेब काकडे शिक्षण समुहाचे प्रमुख शिवाजीराव काकडे माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी अभिनंदन केले.


 
						 
						