संजीवनीच्या विध्यार्थ्यांना रेनाटा प्रिसिझनने दिले ५.५ लाखांचे वार्षिक पॅकेज – अमित कोल्हे

   कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील तीन विध्यार्थ्यांची रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. पुणे या नामांकित कंपनीने मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींचा निकाल कंपनीने जाहिर केला असुन यात मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या विध्यार्थ्यांना  वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केल्याचे जाहिर केले.

संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंटच्या विभागामार्फत या विध्यार्थ्यांना  नेमणुकीचे पत्र बहाल करण्यात आलेे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. या कंपनीने श्रेयश  संभाजी लोहकणेे, शिवकुमार  गुलशन पंजाबी व सत्यम राजेंद्र लासुरे या विद्यार्थ्यांची  निवड केली आहे. हे सर्व विद्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या हातात नोकरीचे नेमणुक पत्र दिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर  अत्यांनद  दिसत होता.

 संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विद्या शाखांमधील विध्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या हेतुने माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९८३  साली केली होती, तो हेतु म्हणजेच ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्या, सरकारी आस्थापने, इत्यादींमध्ये नोकऱ्या  मिळुन स्वावलंबी व्हावे, तसेच काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे.

देश -परदेशात संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर आहेत तर काही नामवंत उद्योजक आहेत. हे केवळ पुस्तकी शिक्षण दिल्याने शक्य झाले नाही तर संजीवनीच्या व्यवस्थापनाने अनोखा संजीवनी पॅटर्न राबवित अनेक मैलाचे दगड पार केले आहेत, दरवर्षी आपलेच उच्चांक मोडीत काढत आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या नावलौकिकाच्या दिशेने  वाटचाल सुरू ठेवली आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे माजी विध्यार्थीही अनेकदा संस्थेला भेट देवुन आपल्या स्मृती जागवतात, तसेच सध्या शिकत  असलेल्या विध्यार्थ्यांना  मार्गदर्शनही  करतात, त्यामुळे विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होत आहे.

 विध्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्यांबाबत त संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन अमित कोल्हे यांनी रेनाटा मध्ये निवड झालेल्या तीनही   विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संस्थेचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी. ठाकुर ,ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डाॅ. एम.व्ही. नागरहल्ली उपस्थित होते.

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये मला प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिकांसह सखोल ज्ञान मिळाले. याचबरोबर काॅलेजमध्ये जे अभ्यासा व्यतिरिक्त जे उपक्रम राबविल्या जातात, त्यात माझा नेहमी सहभाग असायचा, यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाची चांगली जडणघडन झाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने माझ्यात साॅफ्ट स्कील्स विकसीत केल्या. आणि माझ्याकडून काॅलेजने रोबोटिक्सवर इंटर्नशिप  करून घेतली. या सर्व बाबींचा उपयोग मला मुलाखतीच्या वेळी झाला आणि माझी नोकरीसाठी निवड झाली. संजीवनी मुळे माझे व पालकांचे स्वप्न पुर्ण झाले. – श्रेयश लोहकणे