शेवगाव प्रतिनिधी, दि . २८ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी दिनांक ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक व्ही . यु . लकवाल यांनी दिली.
शेवगावातील रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये एकूण सहा खोल्यात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील खोली क्रमांक एक व दोन मध्ये सहकारी संस्थां मतदार संघाच्या ९११ मतदारांची तसेच खोली क्र. ३ व ४ मध्ये ग्रामपंचायत मतदार संघातील ८६९ मतदारांची,
खोली क्र : ५ मध्ये व्यापारी आडते मतदारसंघाच्या एकूण १८६ मतदारांची तर खोली क्रमांक ६ मध्ये हमाल मापाडी मतदार संघाच्या २२१ मतदाराच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे . सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता तहसील कार्यालयात लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान व्यवस्थेसाठी ४० अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे,