कोपरगांव प्रतिनिधी, दि. १४ : संजीवनी एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सातत्याने आपल्या विध्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या कशा मिळतील, कोणत्या बॅन्केला व उद्योगाला कशा प्रकारचे मनुष्यबळ पाहीजे, यासाठी कार्य करीत असतो. या अनुषंगाने अलिकडेच सिटी युनियन बॅन्केलाही एमबीएच्या विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी विनंती केली.
त्यानुसार या बॅन्केने संजीवनी एमबीएच्या विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यांना आवश्यक असणारे सहा विध्यार्थी रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी निवडले, त्यांना सुरूवातीस वार्षिक पॅकेज प्रत्येकी रू ४.६० लाख देवु केले, अशी माहिती संजीवनी एमबीएच्या प्रसिध्दी विभागाने दिली आहे.
प्रत्येक आई वडीलांची सर्वात मौल्यवान संपत्ती असते ती म्हणजे त्यांची संतती. आपली मुलं या महाकाय विश्वात स्पर्धेच्या काळात स्थिर स्थावर व्हावी, त्यांना नोकरी मिळुन ते स्वावलंबी व्हावे, असे स्वप्न डोळ्यात साठवत त्यांना योग्य ठिकाणी योग्य शिक्षण देवुन त्यांच्या पंखात बळ भरीत असतात. अनेक पालकांना त्यांच्या पाल्यांकरीता संजीवनी मधुन शिक्षण घेवुन हमखास संजीवनीच्या प्रयत्नातुनच नोकरी मिळेल याची खात्री असल्याने पालक त्यांच्या पाल्यांसाठी संजीवनीला प्रथम पसंती देतात. संजीवनीचे व्यवस्थापनही पालकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करते.
अशाच प्रयत्नांमधुन सिटी युनियन बॅन्केने भाग्यश्री रामदास वैद्य, कांचन अनिल गोरे, श्रुतिका अनिल बनकर, मधुवंती प्रल्हाद काळे, निखिल चंद्रकांत जाधव व प्रज्वल राजेंद्र कोल्हे यांची वार्षिक पॅकेज रू ४. ६० लाखांवर नोकरीसाठी निवड केली. निवड झालेल्या विद्यार्ध्याना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विध्यार्थी, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व विभाग प्रमुचा डॉ. विनोद मालकर यांचे अभिनंदन केले.
‘मी तालुक्यातील माहेगाव-देशमुख येथिल शेतकऱ्याची मुलगी. मी प्रथम बी.ई. सिव्हिल केले व नंतर एमबीएला संजीवनीमध्ये प्रवेश घेतला. मी एचआर मध्ये स्पेशलायझेशन केले. आमचे एमबीए ऑटोनॉमस असल्यामुळे आधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. आणि त्यामुळे एचआरचे चांगले ज्ञान मिळाले. मात्र या कंपनीचे सर्व अधिकारी इंग्रजी भाषेतूनच प्रश्न विचारतात व तेही राज्याबाहेरील आहेत, याची पुर्व कल्पना आमच्या टी अँड पी विभागाला होती. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे, हे गरजेचे होते. म्हणुन आमच्या टी अँड पी विभागने रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत सलग देान महिने तज्ञ प्राद्यापकाच्या मार्फत आमचे इंग्लिश कम्युनिकेशन स्कीलचे क्लासेस घेतले, आणि आम्हाला जरी खेड्याची पार्श्वभूमी असली तरी आम्ही अस्खलित इंग्रजी बोलु लागलो. याचा फायदा आम्हाला मुलाखतीमध्ये झाला. बाकी मुलाखतीसाठी इतर आवश्यक बाबींची आमच्याकडून तयारी करून घेण्यात आली होती, माझी निवड झाली, माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले, याचे सर्व श्रेय मी संजीवनीला देते.’-मधुवंती काळे