शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : प्रसिद्ध कबड्डीपटू हे कॉ. रमेश किसनराव शेकडे (वय- ६०) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि.२४ ) सायंकाळी साडेपाचला निधन झाले. त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ जावई असा मोठा परीवार आहे.
येथील प्रगतीशील शेतकरी पंढरीनाथ व रामनाथ शेकडे यांचे ते बंधु होते. कै.रमेश शेकडे उत्कृष्ठ कबड्डीपटू होते. त्यानी महाविघालयीन काळात अंतर विद्यापीठीय कबड्डी स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे अनेकदा प्रतिनिधीत्व केले होते.