शेवगाव प्रतिनिधी, दि.११ : अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारीला होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय बनले आहे. या उत्सव सोहळ्याचा आनंद आखंड भारतात विविध स्वरूपात प्रतित होत आहे.
याच पार्श्वर्भूमीवर शेवगावातील रामभक्त, माजी नगरसेवक सागर फडके यांनी आणि त्यांच्या दत्त भक्त त्रीमुर्ती मित्र मंडळाने देखील शेवगावात भाविकासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व छत्रपती शिवरायांचे आस्ते कदम गीत फेम ऋषिकेश रिकामे यांच्या भक्तिमय संगीत संध्याच्या कार्यक्रमाने २० जानेवारी पासून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६ वा. आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक दत्त भक्त मंडळीने केले आहे.