शासन आपल्या दारी उपक्रमचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ : शासनाच्या आयुष्यमान भारत आरोग्य जनकल्याण योजनेसह नवीन मतदार नोंदणी रेशन कार्ड दुरुस्ती आधार कार्ड काढणे व त्याची दुरुस्ती प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजना अशा जनतेच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आम जनतेच्या दृष्टीने अतिशय योग्य प्रकारचा उपक्रम आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांना न्याय देण्याचा प्रयत्न स्तुत्य असून शेवगावातील प्रत्येक प्रभागात सुरू असलेल्या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

शहरातील प्रभाग क्रमांक सात परिसरातील गणपती मंदिराच्या प्रांगणात सोमवारी पार पडलेल्या शासनाच्या विविध योजना ‘कल्याणकारी शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते कचरू चौथे, अप्पर तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी राजेश कदम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पवार, मंडल अधिकारी श्रीनिवास आव्हाड, नगरपरिषदेच्या अभियंता सोनाली शिरसाट, स्वच्छता निरीक्षक भारत चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या उपक्रमात प्रभागासह शहरातील सुमारे ७५० नागरिकांनी सहभाग घेतला. माजी नगरसेवक गणेश, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर विनोद मोहिते, ईश्वर गुणवंत, सुरेश लांडे, किरण काथवटे, विष्णू घनवट, बापूसाहेब धनवडे, हभप संजय महाराज बिलवाल किशोर नांगरे, कैलास मरकड, दत्ता नांगरे विठ्ठल तुपे चरण परदेशी शकुंतला तारू आदिनाथ साबळे संदीप गवळी यांची उपस्थिती होती. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले.