कोपरगाव प्रतिनिधी, दि.०५ : कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले पोहेगांव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांचा सन्मान पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक नितीन औताडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. दादासाहेब औताडे यांचा सत्कार करून नितीन औताडे यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दादासाहेब रामचंद्र औताडे यांना ३१ मते मिळाले. कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सत्काराच्या वेळी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सुभाष औताडे, अरुण डोखे, प्रमोद भालेराव, रियाज शेख, औताडे सुभाष, घारे विठ्ठल, अप्पासाहेब कोल्हे, सोमनाथ मोजड अदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना दादासाहेब औताडे यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे, ज्योती पतसंस्थेचे संस्थापक रवीकाका बोरावके व पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक नितीन औताडे यांनी मला कोपरगाव तालुका फेडरेशनच्या संचालक मंडळात उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिली.
त्यांनी दाखवलेला विश्वास कोपरगाव फेडरेशनच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी मी प्रयत्न करेल. पतसंस्थेचे विविध प्रश्न सोडवण्यास माझा भर राहील असे दादासाहेब औताडे यांनी सांगितले.शेवटी आभार संचालक रियाज शेख यांनी आभार मानले.