शिवछत्रपतीचा आदर्श अंगिकारुन जीवनात यशस्वी वाटचाल करा – अड.संदीप कुलकर्णी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी भावी पिढी समोर होत आहे. हे सूर्यतेज संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा आदर्श अंगीकारून जीवनात यशस्वी वाटचाल करावी. असे आवाहन समाजसेवक अड. संदीप कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात केले.  

सूर्यतेज संस्थापक व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून गेल्या २३ वर्षापासून शिवजयंती उत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने आणि आढाव मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद यांचे विशेष सहकार्यातून शिवजयंती उत्सव २०२४ निमित्ताने चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे संपन्न झाला. 

स्पर्धेला शेतीतज्ञ व समाजसेवक अड. संदीप कुलकर्णी, प्रसिद्ध चित्रकार रवी भागवत, आकाशवाणी निवेदक संदीप मते, मराठा पंच मंडळाचे विश्वस्त मंदार आढाव, विद्यालयाचे विश्वस्त संदिप अजमेरे, मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, पर्यवेक्षक मंगला रायते, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच श्रीमान गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक अड. संदिप कुलकर्णी म्हणाले, आयुष्यात ‘संयम’ आणि ‘नम्रता’ महत्वाची असल्याचे सांगितले. 

प्रसिद्ध चित्रकार रवी भागवत म्हणाले, जिवनात कलेला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्यातील कलासक्त विश्वाला उर्जित ठेवा. असे सांगत हास्य विनोद करित विद्यार्थांशी संवाद साधला. तसेच अवघ्या काही मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलखडूने चित्र प्रात्यक्षिक सादर केले. आकाशवाणीचे निवेदक संतोष मते म्हणाले, सूर्यतेज वतीने शिवजयंती निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सुंदर अनुभव असल्याचे सांगितले. 

शिवजयंती उत्सव २०२४ निमित्ताने चित्रकला स्पर्धेत सुमारे १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सात गटात या स्पर्धा संपन्न झाल्या. बक्षिस विजेत्यांना माॅ साहेब जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजी जाधव आणि भारत सरकार आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांची डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह आणि झाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य राजेश ठोळे, आनंद ठोळे, डाॅ.अमोल अजमेरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षक उमा रायते, योगेश गवळे, दिलीप कुडके, अनिल अमृतकर, अतुल कोताडे, श्रीकांत डांगे, दिगंबर देसाई, निलेश बडजाते यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, प्रास्ताविक सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी तर आभार अनिल अमृतकर यांनी मानले.