विखेंना सर्वाधिक मताधिक्याने निवडुन आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – अरुण मुंढे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : भाजप हा मजबूत संघटन असलेला पक्ष आहे. गावपातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यकर्त्यांपासून ते पदाधिका-यांपर्यंत पक्षाचे जाळे घट्ट विनले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार नेतृत्वाखालील सरकार पुन्हा आणण्यासाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या पाठबळावर खासदार सुजय विखे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते सर्वाधिक मताधिक्याने पुन्हा निवडुन येतील यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी केले.

शेवगाव तालुका भाजपा च्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या पूर्व तयारीसाठी गुरुवारी ता शेवगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

       यावेळी  भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष दिनेश लव्हाट, बाळासाहेब सोनवणे, उदयोग आघीडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, भाजप महिला तालुकाध्यक्षा शितल केदार, जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर, राजुभाऊ लड्डा, अण्णासाहेब ढोके, सालार शेख, शाम कनगरे, भुषम देशमुख, संजय टाकळकर, अनिल वडगाळे, राम पोटफोडे, बाळासाहेब डोंगरे, बाळासाहेब नजन आदी प्रमुख उपस्थित होते.

       यावेळी तालुकाध्यक्ष वैद्य म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज असून त्यासाठी पाच वर्षात सरकारने केलेली कामे, राबवलेल्या योजना, सर्व सामान्य मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आणण्यासाठी खासदार डॉ .सुजय विखे यांना निवडुन आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.

यावेळी लव्हाट, सोनवणे, कोळगे, सागडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन गुरुनाथ माळवदे यांनी केले. तर तुषार पुरनाळे यांनी आभार मानले.