भारतीय खेळ प्रधिकरण अंतर्गत आत्मा मालिकमध्ये निवड चाचणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : भारतीय खेळ प्रधिकरण (साई) भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यामधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या उद्देशाने ‘खेलो इंडिया रायझींग टॅलेन्ट आयडेंटिफिकेशन’ उपक्रमाअंतर्गत आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमीमध्ये दि.२७ मार्च ते ३१ मार्च २०२४ दरम्यान निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

आत्मा मालिक मध्ये होणाऱ्या निवडचाचणीमध्ये कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल व अॅथेलेटिक्स या क्रिडा प्रकारामध्ये वय वर्ष ९ ते १८  वयोगटातील मुले व मुली सहभाग घेवू शकतात. त्यासाठी खेळाडूंनी मायभारत पोर्टल https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

यावेळी बोलतांना आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, आत्मा मालिक स्पोर्टस अकॅडमी मधील कुस्ती व हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांना साईची मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र असून राज्यातील खेळाडू या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. खेळाडूंना वाव देण्यासाठी साई हा स्तुल उपक्रम असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना साई मार्फत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

आत्मा मालिकमधील शैक्षणिक वर्ष २०२४-२४ मध्ये शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्याना राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून एक विक्रम  नोंदविला आहे. तरी या निवडचाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

आत्मा मालिक स्पोर्टस अॅण्ड एज्युकेशनल कॉम्प्लेक्स – नाव नोंदणी साठी संपर्क ९३२५३५२७३७ ,८८३०८५५०६० आत्मा मालिक खेलो इंडिया समन्वयक श्री. शशेंद्र त्रिपाठी कबड्डी क्रीडा प्रकार – दि. २७ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी, हॉलीबॉल  क्रीडा प्रकार: दि. २८ मार्च  रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी, खो- खो क्रीडा प्रकार:- दि. २९ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी, फुटबॉल क्रीडा प्रकार:- दि.३० मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी, अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारः- दि. ३१मार्च रोजी सकाळी 8.00 वाजता नाव नोंदणी. वरील क्रीडा प्रकारामध्ये इच्छुक खेळाडू विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.