रस्त्यावरील तुंबलेल्या नांगरे यांनी पाण्यात पोहत केला नगरपरिषदेचा निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : गेल्या दोन-तीन दिवसापासून शेवगाव परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे शेवगाव शहरातील नाल्या तुंबल्या. शहरातील रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याने खळखळणाऱ्या नदीचे स्वरूप धारण केले. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नाले सफाई झाली नाही. तसेच होणारी सिमेंट काँक्रीटची अवैधअतिक्रमणे रोखली नाहीत त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. 

येथील शोकीन हॉटेल जवळील नाला असाच ओव्हर फूल झाला. त्यामुळे दोन अडीच फूट उंचीचे पाणी शेजारील नगर रस्त्यावरुन वाहत असतांना कॉ.संजय नांगरे यांनी कपड्यासह या पाण्यात पोहत, घोषणाबाजी करत नगरपरिषदेचा धिक्कार केला.

भर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले की,  शाळकरी मुले, वृद्ध पुरुष, महिला, दिव्यांगाना तसेच रहदारीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते दूतर्फा असलेल्या अनेक दुकानात गोदामात पावसाचे पाणी घुसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल खराब होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नांगरे यांनी शनिवारी दुपारी झालेल्या पावसामध्ये रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पोहून शेवगाव नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केला. यावेळी त्यांच्या समवेत निलेश लंके प्रतिष्ठानचे राहुल वरे हे ही या आंदोलनात सहभागी झाले होते.