भक्ती बरोबरच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची महिलांना संधी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा व गौरी गणपतीच्या भक्ती सेवेतून त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी महिलांचा आवडता कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ व गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.
महिलांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्यातील विविध कला-कौशल्याचे सादरीकरण व्हावे याकरीता प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे तसेच सौ. चैतालीताई काळे या नेहमीच अग्रेसर असतात. यावर्षी गौरी गणपती उत्सवात महिला भगिनींचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून खास महिलांकरीता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरातील गौरी गणपती आरास स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी या निमित्ताने महिला भगिनींना उपलब्ध करून देण्यात आली असून ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम व गौरी गणपती आरास स्पर्धेत जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी केले आहे.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे असून सोमवार (दि.९) सायंकाळी ५.०० वा. चासनळी बाजारतळ, मंगळवार/ (दि.१०) दुपारी १.०० वा. पुणतांबा जिल्हा परिषद शाळा, शुक्रवार (दि.१३) सायंकाळी ५.०० वा.कोळपेवाडी बाजारतळ, शनिवार (दि.१४) सायंकाळी ५.०० वा. ब्राम्हणगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, बाजारतळ, रविवार (दि.१५) सायंकाळी ५.०० वा. करंजी श्री मारुती मंदिर समोर, सोमवार (दि.१६) दुपारी १२.०० वा रांजणगाव देशमुख येथे श्री मारुती मंदिर समोर तर सायंकाळी ५.०० वा. भोजडे येथे श्री वीरभद्र मंदिर समोर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांसाठी खास बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुप्रसिद्ध मिमिक्री कलाकार संदीप जाधव व जी.एस.चव्हाण हे करणार आहेत. त्यामुळे भक्ती, मनोरंजन आणि बक्षीस लुटण्याची संधी असा त्रिवेणी संगम या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून साधला जाणार आहे.
यामध्ये पहिले बक्षीस स्मार्ट टि.व्ही., दुसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, तिसरे बक्षीस गॅस शेगडी, चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस टेबल फॅन, सहावे बक्षीस इस्त्री, सातवे बक्षीस डीनर सेट, आठवे बक्षीस लेमन सेट, नववे बक्षीस स्टील भांडे सेट, दहावे बक्षीस कप सेट तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देखील ठेवण्यात आले असून स्पर्धेत सहभागी महिलांना इतरही आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत.
गौरी गणपतीच्या सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी सर्वत्र पाहायला मिळतात. त्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचा व यानिमित्ताने महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा तसेच गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी इको फ्रेंडली साहित्यापासून केलेल्या आपल्या घरगुती गणपती सजावटीचे तसेच गौरी सजावटीचे फोटो ८४६८८१४०६६ या व्हाटस अॅप क्रमांकावर १४ सप्टेबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.