मारुतराव घुले पाटील यांच्या जयंती निमित्त शिवमहापुराण कथेस सुरवात

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : लोकनेते मारुतराव घुले पाटील  यांच्या ९४ व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि १८ पासून सुरु होणाऱ्या शिव महापुराण कथे निमित्त शिव कथाकार समाधान महाराज शर्मा यांची आज सायंकाळी चार ते सहा या कालावधीत  शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून शोभा यात्रेचा प्रारंभ झाला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शोभायात्रा कथास्थळी आली.  यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सपत्नीक डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवरायास अभिवादन करुन पावन गणेशाचे दर्शन घेतले. मिरवणुकीच्या अग्रभागी  हाती भगवा ध्वज घेतलेले अश्वारूढ युवक त्यामागे ग्रामस्थ, विविध संस्थान मधून आलेले  बाल वारकरी, तसेच ठिकठिकाणच्या महिला भजनी मंडळी, डोक्यावर  कलशधारी युवती व  त्यामागे रथात कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा होते. यावेळी  ठिकठिकाणी महिलांनी महाराजांचे औक्षण केले.

शोभा यात्रेत माजी आमदार चंद्रशेखर घुले, ‘पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, तेजस्विनी घुले ‘यांच्यासह शिव महापुराण कथा नियोजन समितीचे पदाधिकारी व  नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा कथा स्थळी आल्यानंतर तेथे  बाल वारक -यांचा नेत्रदिपक रिंगण सोहळा  झाला. त्यानंतर आरती करून कथेस प्रारंभ करण्यात आला.

आज सकाळी आखेगाव रस्त्यावरील चंद्रशेखर घुले यांचे निवासस्थानी शेवगाव पाथर्डीतील संताचे संत पूजन करण्यात आले. भागवताचार्य दिनकर महाराज आंचवले, यावेळी संस्थानचे रामगिरी महाराज, वारकरी संघाचे राज्याध्यक्ष अनिल महाराज वाळके, केदारेश्वरचे बाबागिरी महाराज, राम महाराज उदागे, मारुती महाराज झिरपे, वैभव महाराज माळवदे,  ज्ञानेश्वर महाराज बटूळे यांचेसह १०१ महाराज उपस्थित होते.