शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : येथील वारकरी संप्रदायाच्या रुक्मिणी पांडुरंग भालेराव (वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्या काकू या नावाने पंचक्रोशीत परिचित होत्या. धार्मिक आणि मनमिळावू स्वभाव त्यांचे वैशिष्टय होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, पाच पुतणे, दोन नाती, दोन नातू, सून असा परिवार आहे.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष , ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या त्या चुलती तर संचालक विष्णुपंत भालेराव यांच्या त्या मातोश्री होत. कै. काकूच्या इच्छेनुसार आयुष्यातील सर्वाधिक काळ घालविलेल्या तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणांत त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.