शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : नांदेड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत येथील आबासाहेब काकडे विद्यालयाचा खेळाडू युवराज महादेव मांडकर याने ६८ व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करत, महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत छत्तीसगड संघाला ६-१ अशा फरकाने पराजित करून सुवर्णपदक मिळविले.

यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत, संतोष ढोले, सचिन वाल्हेकर, विक्रम घुटे यांचे मार्गदर्शन लाभले. काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधर काकडे, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंगभैय्या काकडे, अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर, अध्यक्ष अरुण चंद्र, उपाध्यक्ष सुधीर चपळगावकर, विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते आदिंनी या खेळाडूचे अभिनंदन केले.
