महिला दिनानिमित्त पंचायत समितीत आशा स्वयंसेविकांचा मेळावा 

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर यांचे उपस्थितीत आशा स्वयंसेविकांचा मेळावा तसेच रांगोळी स्पर्धा व महिला आरोग्य तपासणी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आरोग्य अधिकारी माधुरी शिरसाठ, प्रतिभा पंडित, आशा गट प्रवर्तक प्रमिला ढाकण पोटफोड, चंद्रकला जराड, प्रतिभा सातपुते, यमुना दौंड, मनिषा पोपळे, शिल्पा मुळे, मनिषा भांगरे, गीता सोनवणे यांच्यासह अनेक आशा स्वयंसेविका तसेच पंचायत समितीच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमंती सारजा काळे, क्षयरोग पर्यवेक्षक रियाज पटेल आदिची उपस्थिती होती.

महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे महत्त्व, त्यांचे कार्य व योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमात महिला आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महिलांच्या योगदानाला गौरवण्यात आले आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजनांची माहितीही देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सर्वआशा स्वयंसेविकाना  शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ संकल्प लोणकर, सूत्रसंचालन यमुना दौंड यांनी सूत्रसंचलन केले, तर गीता सोनवणे यांनी आभार मानले. 

Leave a Reply