मतदार संघातील ०३ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव मतदार संघातील विविध गावातील मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी व हि विकासकामे सुरु होवून नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून कोपरगाव मतदार संघातील जवळपास १९ गावातील ०३ कोटीच्या स्मशानभूमी, रस्ते व विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या विकास कामांचा तपशील पुढीलप्रमाणे असून यामध्ये २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत रस्त्याच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोकमठाण येथे पुणतांबा रोड ते धोंडीराम गायकवाड रस्ता करणे (३०लक्ष), वारी येथे गावांतर्गत रस्ता करणे (२०लक्ष), शिंगणापूर येथे दत्तनगर ते हिरे वस्ती रस्ता करणे (२०लक्ष), ब्राम्हणगाव येथे येसगाव-ब्राम्हणगाव रोड गाढे वस्ती ते टाकळी ब्राम्हणगाव रोड उळेकर वस्ती पर्यंत रस्ता करणे (३०लक्ष), सुरेगाव येथे गावांतर्गत मोतीनगर स्मशानभूमी रस्ता करणे (३०लक्ष), चासनळी येथे गावांतर्गत रस्ता करणे (२०लक्ष) अशा एकूण दीड कोटीच्या रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तसेच २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायतींना जन सुविधा विशेष अनुदान योजने अंतर्गत विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये डाऊच खु. ग्रामपंचायत कार्यालय बांधणे (१५लक्ष),माहेगाव देशमुख स्मशानभूमी विकास करणे (२०लक्ष), दहेगाव बोलका गावांतर्गत गुलाबराव वलटे घर ते पाणी पुरवठा पर्यंत रस्ता करणे (१०लक्ष), आपेगाव स्मशानभूमी विकास करणे (१० लक्ष), धामोरी स्मशानभूमी विकास करणे (१० लक्ष),मढी खु. स्मशानभूमी विकास करणे (१० लक्ष),

 सडे येथे गावांतर्गत संपत टकले घर ते महादेव मंदिर रस्ता करणे (१०लक्ष), तिळवणी स्मशानभूमी विकास करणे (१०लक्ष), शहापूर स्मशानभूमी विकास करणे (१०लक्ष), धोंडेवाडी स्मशानभूमी विकास करणे (१५लक्ष), खोपडी गावांतर्गत खंडोबा मंदिर रस्ता करणे (१०लक्ष), लौकी येथे नागपूर हाय वे ते भवर (कॅनॉल) रस्ता करणे (१०लक्ष), धोंडेवाडी येथे गावांतर्गत म्हसोबा मंदिर कवडे वस्ती रस्ता करणे (१०लक्ष) अशा एकूण दीड कोटी असे एकूण ०३ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या अनेक गावातील स्मशान भूमींचा विकास करणे गरजेचे होते तसेच काही रस्त्यांचा देखील विकास करून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी स्मशान भूमी विकासासाठी, रस्त्यांसाठी व विविध विकास कामांना महायुती शासनाकडून आ. आशुतोष काळे यांनी निधी मिळविला होता. या विकास कामांना महायुती शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात होणार आहे.

त्यामुळे या १९ गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. ०३ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply