आर्थिक लाभ न मिळाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून विकासकामात अडथळा – अल्ताफ कुरेशी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील आयेशा कॉलनी येथे सुरू असलेल्या गटारीच्या कामावरून आर्थिक लाभ मिळाला नाही त्यामुळे राजकारण करून काळे गट राष्ट्रवादीने सुशिक्षित इंजिनिअरची जाणूनबुजून बदनामी करण्याचा दुर्दैवी प्रकार घडवून आणला आहे. खोटा प्रसार करणाऱ्याना उत्तर देताना प्रत्यक्षात ठेकदारावरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे असा धक्कादायक खुलासा ठेकेदार इंजिनिअर जुन्नैद कुरेशी यांनी केला आहे.

सदर गटारीच्या कामात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महत्त्व न मिळाल्याने, आणि आर्थिक तडजोड न केल्याने त्यांनी कामात अडथळा आणला आहे. तसेच कामातून निघालेल्या मातीवर हक्क सांगत ती खाजगी जागेत टाकण्यासाठी राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. प्रामाणिकपणे कष्ट करून, शिक्षणाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभारणाऱ्या या तरुण इंजिनिअरच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी गैरमार्गाने व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवत खोटे आरोप लावून नागरिकांची दिशाभूल करण्याचा कुटील डाव रचला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी विरोध करणारे त्यांचे कार्यकर्ते असल्याने काळे गटाचे बिंग फुटले आहे अशी प्रतिक्रिया अल्ताफ कुरेशी यांनी दिली आहे.

गुंडांना अभय देऊन सामाजिक सलोखा बिघडवणे, विकासकामात अडथळे निर्माण करणे आणि प्रामाणिक ठेकेदाराची बदनामी करणे हे काळे गटाचे जुने पाप आहे. कोल्हे गटाने प्रथमच अल्पसंख्याक समाजाला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली ती काळे गटाची पोटदुखी आहे त्यामुळे ते अल्पसंख्याक समजात दुही निर्माण करत आहे असा खुलासा आरिफ कुरेशी यांनी केला आहे.

आमदार काळे यांच्या स्विय सहायकाच्या भावाला सदर काम मिळाले नाही, याचा राग काढण्यासाठी आमच्या सुशिक्षित भावाला त्याच्या मेहनतीवर मिळालेल्या कामामुळे ते ठेकेदारावर दबाव आणून विकासकाम थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिम समाजातील तरुण पिढी शिक्षण घेऊन प्रगती करत असताना त्यांना रोखून कामे बंद पाडणे व राजकीय खिसे भरायचे प्रकार थांबले पाहिजेत.

कोल्हे गट विकासकामांमधून प्रामाणिकपणे पारदर्शकतेने काम करतो आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. मात्र आमदार काळे यांनी आपल्या अपयशाचे आणि नाकर्तेपणाचे पाप झाकण्यासाठी कोल्हे गटाला बदनाम करण्यासाठी बगलबच्यांचा वापर सुरू केला आहे. जनतेची दिशाभूल करत आमदार काळे यांनी स्वतःच्या गटातील ठेकेदारांच्या फायद्यासाठी कोण पाठराखण करते, याची माहिती घ्यावी. नाहक बदनामीच्या प्रयत्नांतून कोल्हे गटावर शिंतोडे उडवू नये अन्यथा त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा कुरेशी यांनी दिला आहे.

Leave a Reply