कोल्हेंचं राजकीय पुनर्वसन होणार – देवेंद्र फडणवीस 

 कोपरगाव प्रतीनीधी, दि. ५ : कोपरगाव तालुक्यासह आजूबाच्या अनेक तालुक्यांमध्ये कोल्हेंचा जनमानसांत मोठा प्रभाव आहे. त्यांचे अनेक ठिकाणी कार्यकर्ते कार्यरत आहेत अशातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांना निवडणुकीच्या  रिंगणात उभारायचे असुनही केवळ पक्षीय युतीच्या अडचणींमुळे निवडणूक रिंगणातून बाजूला जावे लागले होते.

पारंपारिक राजकीय विरोधक असलेले आमदार आशुतोष काळे यांना महायुतीकडून राष्ट्रीय काॅंग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकाला उभे होते त्यामुळे युती धर्म म्हणून कोल्हे परिवाराने प्रामाणिकपणे काळेंना मतद करुन राज्यात विक्रमी मतांनी विजयी करण्यात कोल्हेंचा हात होता.

वरिष्ठ पातळीवर राजकीय नेते त्यांच्या शब्दाला मान देत कोल्हे कोणतेही राजकीय पद न घेता आजपर्यंत बसुन होते. माञ रविवारी कोल्हे यांच्या दोन प्रकल्पाच्या उद्घाटण प्रसंगी कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करतात का ? किंवा त्या संदर्भात कोणी काही बोलतात का? याकडे सर्वांचे लक्ष होते अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात कोल्हेंच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, विधानसभेला कोल्हे परिवाराने आमच्या पार्टीच्या आमदार आशुतोष काळेंना विजयी करण्यासाठी मोठी मदत केली त्याची जाणिव मला आहे.

आगामी काळात कोल्हे यांच्याबद्दल योग्य तो विचार करु म्हणताच उपस्थितांमध्ये विवेक कोल्हे यांच्या नावाचा जयजयकार सुरु झाला. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हे यांच्या  त्यागाचा गौरव करुन लवकरच कोल्हे यांचे पुनर्वसन होईल असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कोल्हेंचा जयघोष केला. 

 संजीवनी विद्यापिठाच्या प्रांगणात कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या दोन नव्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला कोल्हे समर्थकांची विक्रमी गर्दी झाल्याने जिल्ह्यात कोल्हे पुन्हा चर्चेच्या अग्रभागी दिसत आहेत. आगामी काळात कोल्हे यांना केंद्रात संधी मिळते की, राज्यात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply