कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव मतदार संघातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील १८ वीज रोहीत्रांसाठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ०१ कोटी ४२ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. यामध्ये नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज रोहित्र स्थलांतरीत करणे, पोल बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

या ०१ कोटी ४२ लाख निधीतून कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील माहेगाव देशमुख शिवरस्ता सिंगल फेज गावठाण लाईन टाकणे व सहा ते सात विजेचे पोल बसविणे, कोकणठाण, कोळपेवाडी, देर्डे कोऱ्हाळे येथील मढी फाटा डीपी, माहेगाव देशमुख, मुर्शतपूर, सोनारी, सोयगाव, उक्कडगाव, धोत्रे, भोजडे, पढेगाव, मंजूर, करंजी बु., तसेच कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील रामपूरवाडी, शिंगवे तसेच वाकडी व पुणतांबा येथील डीपी स्थलांतरित करणे आदी रोहित्र व उर्जा विभागाची कामे करण्यात येणार आहे.

वीज रोहीत्रांच्या या प्रशासकीय मान्यतेमुळे कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विविध गावातील विजेच्या समस्या सुटण्यासाठी मोलाची मदत होवून नागरीकांच्या अडचणी सूटणार आहे. ग्रामीण भागातील कृषी व घरगुती वीज ग्राहकांना अखंडीत विजपुरवठा या नवीन वीज रोहीत्रामुळे होणार आहे. यामुळे कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा व्यवस्था अधिकच मजबूत होणार असून नागरिकांना स्थिर व दर्जेदार वीज सेवा उपलब्ध होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

विजेच्या समस्या बाबत आ.आशुतोष काळे यांच्याकडे मांडलेल्या अडचणी त्यांनी समजून घेवून नवीन वीज रोहीत्रांसाठी त्यांच्या पाठपुराव्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून विजेच्या समस्या दूर होण्यास मदत होणार असल्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


