कोपरगावमध्ये ९ नगराध्यक्ष तर २२१ नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वञिक निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केल्याने किती उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरता व कोण कोण उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार याची उत्सुकता लागली होती तसेच  १५ प्रभागातून ३० नगरसेवकांच्या निवडीसाठी किती उमेदवार उमेदवारी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली. शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज भरले. त्यात भाजप कडून पराग संधान यांचे ४ अर्ज, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ओमप्रकाश तथा काका कोयटे २ अर्ज त्याच पक्षाकडून सुहासिनी कोयटे २ अर्ज, शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र झावरे २ अर्ज, शिवसेना ठाकरे गटाकडून सपना मोरे १ अर्ज, तर अपक्ष उमेदवारामध्ये दिपक वाजे, विजय वहाडणे, योगेश वाणी, रहिमुलीसा कुरेशी यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी भरले आहेत. 

नगरसेवक पदासाठी १५ प्रभागातून ३० नगरसेवक पदासाठी तब्बल २२१ उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी आल्याची माहीती  उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या कोपरगाव परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या सर्व अर्जांची या ठिकाणी सदस्यांची आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी तहसील कार्यालयात होणार आहे. अर्ज छाननीसाठी उमेदवारांनी हजर राहवयाचे आहे. 

 उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक १९ , २० आणि २१ नोव्हेंबर या तीन दिवसाची मुदत दिलेली आहे. २१ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांनी लेखी स्वरुपात स्वतः किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया २१ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर २६ तारखेला अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पाडली जाईल.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे.  सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सूचक सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आवाहन आहे की, आदर्श आचारसंहितेच पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत. उद्यापासून नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे त्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केलेली आहे. विहित नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा.

प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याच्या पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणारे त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणात्मक छापून घेतली पाहिजे. त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी माहीती देताना म्हणाले की, नगराध्यक्षासह नगरसेवक पदासाठी एकुण २३६ अर्जांची छाननी ही उद्या सकाळी १८ तारखेला सकाळी ११ वाजता याच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार नघडता शांततेत सुरु असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी विषेश मदत करीत प्रक्रिया सुरळीत केली. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुभार यांनी चोख पोलीस बंदोबस्त  ठेवला होता. 

Leave a Reply