पक्षाचे चिन्ह मिळणाऱ्यांनी प्रचारात घेतली आघाडी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाचे चिन्ह मिळणाऱ्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत आपलं चिन्हा घराघरात पोहचवले आहेत. माञ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकतीने उतरले, माञ कोणत चिन्ह मिळणार याचा आजूनही थांगपत्ता नसल्याने केवळ स्वत:च्या नावावर मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत अपक्ष उमेदवारींची तसेच स्थानिक पातळीवर आघाडी केलेल्या उमेदवारांची निवडणूक चिन्ह लवकर न मिळाल्याने चांगलीच कोंडी झाली. उमेदवाराचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. आज अर्ज माघार घेतल्या नंतर जरी निवडणुकीची एक दिशा नक्की होईल. कोण कोणाच्या विरोधी उभा आहे किंवा एका प्रभागात एकमेकांविरुद्ध कितीजन उभे आहेत त्यात अधिकृत पक्षाच्या वतीने किती व अपक्ष किती हे जरी स्पष्ट झाले तरीही अपक्ष उमेदवारापुढे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आणखी एक संकट आहे ते म्हणजे थेट २६ तारखेला उमेदवारांना उमेदवारी चिन्ह मिळणार आहे.

२६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी चिन्ह मिळाल्यानंतर पुढे केवळ पाच दिवस प्रचारासाठी व मतदारांपर्यंत चिन्ह पोहचवण्याचे जिकरीचे काम करावे लागणार नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार यांना तर तब्बल १५ प्रभागात घराघरा पर्यंत आपले उमेदवारी चिन्ह कसं पोहचवतील आणि आपला करीष्मा कसे दाखवणार. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने कदाचित अपक्षांना कमी संधी कशी मिळेल याची व्यवस्था केली की काय? अतिशय कमी कालिवधीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी गतीमान प्रचार यंत्रणा राबवणारे उमेदवार अधिक यशस्वी होण्याची शक्यता दाट आहे.

कोपरगाव नगरपालीकेच्या या निवडणुकीत चौरंगी लढत सध्यातरी दिसत असली तरीही जर काही अपक्ष उमेदवारांनी जोर लावला तर तीच निवडणूक काही प्रभागात पंचरंगी होईल तर काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, व चौरंगीही होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठी सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, दोन्ही सेना यांच्यामध्ये लढत दिसत असली तरीही अपक्ष उमेदवार किती ताकत लावतात तसेच दोन्ही शिवसेना आपल्याकडे किती मतदारांना आकर्षित करतात यावर निवडणुकीचे चिञ स्पष्ट होईल. अर्ज कोण माघार घेतो. ते कोणाला पाठिंबा देतात तसेच पक्षांतर्गत असलेल्या नाराजीचा सुरु कोणाच्या सुरात सुर मिसळतात यावर बसेच राजकीय गणित अवलंबून आहेत.

दरम्यान अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोण कोणासाठी पळतं अथवा पळवा पळवी करतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनेकांनी आपली उमेदवारी निश्चित आहे, म्हणून प्रभाग निहाय प्रचार जोरात सुरू केला. माञ शेवटच्या क्षणाला कोणाला माघार घेण्याची वेळ येते तेही लवकरच स्पष्ट होईल. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी एबी फाॅर्म जोडल्यामुळे ते जरी निश्चित झाले तरीही त्याच पार्टीकडून इतरांनी अर्ज दाखल केले त्यांनी जर उमेदवारी अर्ज माघार घेतली नाही तर अंतर्गत डोकेदुखी वाढण्याची शक्यता दाट आहे.

शुक्रवारचा दिवस कोपरगावमध्ये मोठ्या घडामोडीचा दिवस असणार आहे. तसेच नाराजी नाट्याचे अनेक प्रकार पहावयास मिळणार आहे. अपक्षांची उमेदवारी चिन्हामुळे कोंडी झाली तर पक्ष पार्टीच्या उमेदवारांना समोर किती उमेदवार आहेत आणि कोणा कोणाच्या विरोधात प्रचार करावा हेच कळत नसल्याने कोपरगावमध्ये वैयक्तिक गाठीभेटीवर जोर सुरु आहे. काही अपक्ष उमेदवारांनी चिन्ह नसलेले बोर्ड शहरात लावून ‘नाम ही काफी है’ असाचा संदेश देत आहेत. काही झालं तरीही अपक्ष उमेदवारांची या निवडणुकीत दमछाक होणार हे निश्चित आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस २१ नोव्हेंबर. उमेदवारांना चिन्ह वाटप -२६ नोव्हेंबर प्रचार करण्याचा शेवटचा दिवस – ३० नोव्हेंबर राञी १० वाजता. मतदान – २ डिसेंबर तर मतदानाचा निकाल ३ डिसेंबर आहे.


