कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगावच्या नागरीकांसह कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा राञ वैऱ्याची आहे. अतिउत्साहात जर या ठिकाणी चुकलात तर पाच वर्षे भोगावे लागेल त्यामुळे डोळे उघडे ठेवा, डोकं शांत ठेवा, जो पर्यंत पराग संधानसह सर्व आपले नगरसेवक विजयी होत नाही तोपर्यंत एकजन शांत बसु नका असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत दिला. विरोधकांच्या विविध प्रकारच्या रणनितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत सावधानतेचा इशारा दिला.

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत यावेळी भाजप मिञ पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधानसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना कोपरगावच्या मतदारांनी विजयी केले तर कोपरगावच्या विकासासाठी हवी ती मदत मी करणार आहे असे म्हणत कोल्हे यांच्या वतीने खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपरगाव नगरपालीकेची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

जिल्ह्यात केवळ कोपरगावच्या निवडणूक प्रचाराची सभा फडणवीस यांनी घेतल्याने जिल्ह्यात कोपरगावची निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी जातीने लक्ष घालुन प्रचाराचा धुरळा उडवत आहेत तर भाजप मिञ पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी गल्ली बोळात जावून मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर जोर देत प्रचारात आघाडी घेत आहेत. कोपरगाव नगरपालीकेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा किती करिश्मा होतो याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


