नगराध्यक्ष पदाच्या तिंघासह ५४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ :  कोपरगाव नगरपालीकेच्या २०२५ सार्वञिक निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाचे ५ उमेदवार होते या निवडणुकीत भाजपचे पराग सांधान यांनी सर्वाधिक मतांनी विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात आमदार आशुतोष काळे  गटाचे उमेदवार राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांचा ४०९ मतानी पराभव झाला. या निवडणुकीत पराग संधान जरी विजयी झाले तरी त्यांच्या विजया बरोबर पराभव झालेल्या उमेदवारांची चर्चा सर्वाधिक होत आहे. 

 शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व कोपरगावचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे हे या निवडणुकीत काही तरी चमत्कार घडवतील असे वाटत होते त्यात शेवटच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यामुळे कोपरगावचे समिकरण  बदलणार असे वाटत होते, पण तसे काहीच घडले नाही. उलट राजेंद्र झावरे यांना ४३ हजार २४७ पैकी केवळ ३ हजार ४९६ मतदारांनी मतदान केल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

तसेच गेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विक्रमी मते मिळवून राज्यात प्रथम क्रमांकाने विजयी झालेले नगराध्यक्ष म्हणून नाव कोरले होत. पण यावेळी त्याच कोपरगाव करांनी विक्रमी विजयी झालेल्या वहाडणेंना या निवडणुकीत केवळ ५९१ इतकी  निच्चांकी मते देत अनामत रक्कम सुध्दा वाचवू दिली नाही. 

शिवसेना ठाकरे गटाच्या सपना मोरे यांनी कोणतीही  व त्यांचे पती भरत मोरे यांनी एकाकी  लढा देत  सर्वसामान्य मतदारांच्या मनात जागा करण्याचा प्रयत्न केला माञ मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सपना मोरे  यांना केवळ २ हजार १७६ मते देवून तिसऱ्या स्थानावर बसवले परंतू त्यांनाही आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही ती जप्त झाली.

सोबतच भरत मोरे हे नगरसेक पदासाठी उभे होते तिथेही त्यांचा पराभव झाला. कोपरगाव नगरपालीकेच्या या निवडणुकीत एकाचवेळी पती पत्नीचा पराभव झाल्याची चिञ दिसुन आले. नगराध्यक्ष पदासाठी लढा देणाऱ्या सपना मोरे ह्या यापुर्वी नगरसेविका होत्या तर भरत मोरे हे  ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. 

 दरम्यान  नगरसेवक पदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक १५ प्रभागातून उभे होते त्यापैकी ३० नगरसेवक विजयी झाले त्यात भाजप आरपीआय व मिञ पक्ष लोकसेवा आघाडीचे १९ नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  ११ नगरसेवक निवडून आले उर्वरित  ९२  पराभूत उमेदवारांपैकी तब्बल ५४ उमेदवारांना अतिशय कमी मते पडल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहीती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली. 

 दरम्यान या निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत त्यात  विमल मरसाळे,  प्रदिप कुऱ्हाडे, संजना गवळी, सविता मंजूळ, पल्लवी दडियाल सारंगधर प्रसाद, मुकुंद भुतडा, सुनिल गंगुले यांचे अर्ज आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांच्यावतीने सुनिल गंगुले यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार फेर मतमोजणी करण्याच्या किचकट अटी शर्ती असल्याने तसेच जर संपूर्ण निकाल लागल्यानंतर तक्रार केल्यास त्याची फार काही दखल घेतली जाणार नाही मतमोजणी सुरु असताना त्याक्षणाला  हरकत घेवून पुन्हा मतमोजणी करून घेणे अपेक्षित आहे तेव्हा कोणाच्याही अर्जानुसार  फेरमतमोजणी  करणे हे आमच्या हातात नाही ते थेट निवडणूक आयोगाच्या हातात आहे असे म्हणत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे, तहसीलदार सावंत व मुख्याधिकारी यांनी सांगितले.

Leave a Reply