कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ५.१८ कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या विकास कामांना सुरुवात होणार आहे.

या प्रशासकीय मंजुरीच्या कामामध्ये कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे चारी नं. ५ कदम वस्ती ते भगुरे शेत रस्ता खडीकरण करणे (७ लाख), संवत्सर येथे सुनील कुहिले घर ते शरद शेटे घर रस्ता खडीकरण करणे (१० लाख), कोकमठाण येथे भाऊसाहेब रक्ताटे वस्ती ते जि.प. शाळा कांचनवाडी रस्ता करणे (१०लाख), खिर्डी गणेश येथे अहिल्यानगर-मनमाड रस्ता ते रावसाहेब बावके वस्ती शिवरस्ता खडीकरण करणे (२० लाख), खोपडी येथे भऊर रस्ता खडीकरण करणे (४० लाख), जेऊर कुंभारी येथे रस्ता डांबरीकरण करणे (२५ लाख), जेऊर पाटोदा येथे जिजाऊ पार्क ते चंद्रलिला नगर रस्ता करणे (३० लाख),

टाकळी येथे जि.प.शाळा ते बाबासाहेव देवकर घर रस्ता ७ चारी खडीकरण करणे. (निधी १५ लाख), तळेगांव मळे येथे गावठाण ते भाऊसाहेव भवर वस्ती रस्ता करणे (बेलगाव रस्ता) खडीकरण करणे. (निधी ३० लाख), दहीगांव बोलका येथे वीरभद्र मंदिर ते नानासाहेब निघोट ते विजय पराग वस्ती रस्ता खडीकरण करणे. (निधी २५ लाख), धामोरी येथे विश्वास जाधव वस्ती ते सत्यगाव रस्ता डांबरीकारण करणे. (विठ्ठलराव जगझाप वस्ती) (निधी४० लाख), नाटेगांव येथे गावठाण ते येसगाव रोड जयराम धोंडीबा मोरे घर रस्ता डांबरीकरण करणे. (निधी २७ लाख), मढी बु येथे रा.मा. ७ ते ग्रा.मा. ३० रस्ता डांबरीकरण करणे, (निधी ४० लाख), सांगवी भुसार येथे माणिक गयाजी शिंदे घर ते सांगवी भुसार गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, (निधी ४० लाख).

माळेगांव थडी येथे गोदावरी नदी ते मळेगाव थडी रस्ता डांबरीकारण करणे (निधी ४ लाख), करजी बु. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण करणे (निधी१५ लाख), ब्राम्हणगांव येथे संपतराव आसणे दुकान ते पांडुरंग आसणे घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे (निधी १०लाख), वेळापूर येथे रामा ७ ते बिरोबा मंदिर (कारवाडी शिव) रस्त्यावर सी.डी.वर्क करणे (निधी २५ लाख), कोळगांव थडी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. (शेड, शवदाहिनी इ.) (निधी १०लक्ष), हिंगणी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे. (रोड, शवदाहिनी इ.) (निधी १०लक्ष),

राहाता तालुक्यातील जळगांव येथे विजय बबन चौधरी घर ते गोदावरी उजवा कालवा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (निधी ३० लाख), रामपुरवाडी येथे पाझर तलाव ते अण्णासाहेब देठे घर रस्ता खडीकरण करणे (निधी १५लाख), शिंगवे येथे बारहाते गिरणी ते बाबासाहेब कवडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (निधी ४०लाख ) या एकूण तेवीस गावांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील अनेक ग्रामीण भागातील रस्ते नव्याने विकसित होणार असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात त्याचा निश्चित फायदा होईल. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल. रस्त्यांशिवाय विकास अशक्य असून चांगले रस्ते हे प्रत्येक गावाच्या प्रगतीचे प्रतीक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक गावासाठी चांगले रस्ते निर्माण करणे हे माझे ध्येय आहे.

यापूर्वीही मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण केली असून काही कामे प्रगती पथावर आहेत तर काही विकासकामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यापुढील काळातही नागरीकांना ज्या रस्त्यांची कामे होणे अपेक्षित आहे त्या सर्वच रस्त्यांसाठी महायुती शासनाकडून निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने ग्रामविकासाचा वेग आता अधिक वाढणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.


