कोपरगाव धुळमुक्त ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांची – नगरसेविका त्रिभुवन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख होवून बसली होती. परंतु आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यांच्या कामांना कित्येकांचा विरोध असतांनाही सर्वप्रथम रस्त्यांचा विकास केला त्यामुळे कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यास मदत होवून कोपरगाव शहराची धुळमुक्त शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे.

त्यामुळे ही वाटचाल यापुढे अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण कोपरगाव शहर धुळमुक्त ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आरोग्य व स्वच्छता कमिटीच्या सदस्या नगरसेविका सोनम त्रिभुवन यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते तसेच गल्लीबोळांमधील रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे त्यामुळे रस्त्यांवरील धूळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यापुढेही कोपरगाव शहर कोपरगाव शहर धुळमुक्त राहणे कोपरगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

परंतु शहरातील काही भागांमध्ये अद्यापही धूळ व अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांतील सर्व रस्त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक प्रभागामध्ये प्रभावी कचरा व्यवस्थापन नियोजन करून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यांची नियमित निगा राखल्यास रस्त्यांवरील धूळ व घाणीचे साम्राज्य पूर्णतः नष्ट होऊन नागरिकांचे आरोग्य अबाधित राहणार आहे.

यासाठी कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात आठवड्यातून दोनदा स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्याकरीता कोणत्याही प्रकारची मदत व सहकार्य करण्यासाठी आ.आशुतोष काळे सदैव तयार आहेत.यापूर्वीही त्यांनी कोपरगाव नगरपालिकेला आवश्यक मदत केलेली आहे व यापुढेही करणार आहेत.

त्यासाठी शहरामध्ये नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी आणि तसेच कोपरगाव शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी पालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका सोनल त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply