अम्मा असोसिएशनच्या वतीने अभिमानाने कळविण्यात येते की, CIB&RC च्या 466 ते 469 व्या रजिस्ट्रेशन कमिटी बैठकीत भारतात प्रथमच 9 बायोपेस्टिसाइड्सना नोंदणी मंजूर करण्यात आली असून, हे ऐतिहासिक यश अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे व सचिव डॉ. प्रशांत धारनकर यांच्या नेतृत्वाखाली मागील 8 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून साध्य झाले आहे.

या कार्यात 6 राज्य कृषी विद्यापीठे, 1 केंद्रीय कृषी विद्यापीठ, 2 ICAR संस्था व 3 टॉक्सिकॉलॉजिकल संशोधन संस्थांचे सहकार्य लाभले आहे. सध्या भारतात एकूण 9 बायोपेस्टिसाइड्स कायमस्वरूपी नोंदणीकृत झाले असून 40 कंपन्यांसाठी डेटा शेअरिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच Ashwamedh Agritech and Farm Solution Systems कडून 470 व्या RC मध्ये 2 बायोपेस्टिसाइड्स यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले आहेत.

या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना पिकांचे किडींपासून संरक्षण, उत्पादनवाढ तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल अम्मा असोसिएशनच्या सर्व सदस्य, कार्यकारिणी व संबंधित घटकांनी अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले असून पुढील RC मध्ये itar 40 उत्पादक कंपन्यांना परवानगी मिळेल अशी माहित प्राप्त झाली आहे . आता पुढील वाटचालीत आणखी 5 उत्पादने नोंदणी प्रक्रियेत pipeline. आहेत . महाराष्ट्रातून देशाला प्रमाणित बायोपेस्टिसाइड्स देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


