राजविका कोल्हेला मानाचा ‘बेस्ट डेलिगेट’ पुरस्कार

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी  येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट वक्तृत्व, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत बेंगळुरू येथे नुकतेच  झालेल्या ‘मॉडेल युनायटेड नेशन्स’ (एमयुएन) या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजाची प्रतिकृती असलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या परिषदेत करत घवघवीत यश संपादन केले. राजविका अमित कोल्हे हिने प्रसिद्ध महिला सुपरहिरो ‘हॉकगर्ल’ चे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला या संपूर्ण समितीमधील सर्वोच्च ‘बेस्ट डेलिगेट’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

      गिरीराज प्रमोद जमधाडे याने प्रसिद्ध धनुर्धारी सुपरहिरो ग्रीन ॲरोच्या भुमिकेचे प्रतिनिधित्व करत आपल्या कौशल्याच्या जोरावर ‘स्पेशल मेंशन’ पुरस्कार पटकावला. सिद्धिका रामचंद्र दादवानी हिने स्वीडन देशाचे प्रतिनिधित्व करत उत्तम युक्तिवाद केला आणि ‘व्हर्बल मेंशन’ पुरस्कार मिळविला.याच समितीत साईष्का सुरेश शेट्टी हिने मेक्सिकोचे, तर माही बाळासाहेब जाधव हिने दक्षिण आफ्रिकेचे अतिशय आत्मविश्वासाने प्रतिनिधित्व केले.

गिरिजा तुषार मोदी हिने माजी खासदार महुआ मोईत्रा यांचे भुमिकेचे आक्रमक प्रतिनिधित्व करत ‘व्हर्बल मेंशन’ पुरस्कारावर नाव कोरले. याच समितीत रितिका रवींद्र गोंदकर हिने काँग्रेस नेते शशी  थरूर यांच्या भूमिकेतून आपले मत मांडले. प्रथम रैतानी आणि स्वरूप रवीशंकर गोंदकर या दोघांनी नेदरलँड्स देशाचे प्रतिनिधित्व करत क्रीडा धोरणांवर मते मांडली. अगस्त्य प्रताप सिंह याने सुप्रसिद्ध रेसर फर्नांडो अलोन्सो यांचे उत्तम प्रतिनिधित्व करत सर्वांचे लक्ष वेधले.

   या तीन दिवसीय परिषदेमध्ये भारतातील विविध राज्यांमधील विविध सीबीएसई स्कूल्स मधिल सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या १० विद्यार्थ्यांनी  वेगवेगळ्या समित्यांमध्ये सहभाग नोंदवला. या सर्व विध्यार्थ्यांना शिक्षिका अर्पिता चोपडे यांचे मार्गदर्शन  लाभले.

   एमयुएन हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचे  प्रतिनिधी बनुन हवामान बदल, दहशतवाद, मानवाधिकार, गरीबी, आरोग्य, इत्यादी विषयांवर चर्चा, वादविवाद, वाटाघटी, करून त्या समस्यांवर उत्तर शोधतात. यामुळे विध्यार्थ्यांचे भाषण  कौशल्य, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, समुह कार्यपध्दती, जागतिक दृष्टीकोन, अशा  अनेक मुल्यांची रूजवण होते. संजीवनीच्या विध्यार्थ्यांना अशा  विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मार्गदर्शन  करून प्रवृत्त केल्या जाते. स्कूल शैक्षणिक  बाबींवर जेवढे लक्ष देते, तेवढेच लक्ष व्यक्तिविकासाच्या दृष्टीने  प्रयत्नशील  असते. सुमारे ३५० पेक्षा अधिक स्पर्धकांतुन संजीवनी इंटरनॅशल स्कूलला अग्रभागी नेले, ही संजीवनीची उपलब्धी आहे. – डाॅ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्स.  

   विध्यार्थ्यांच्या  या राष्ट्रीय यशाबद्दल संजीवनीचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आणि संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांनी सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे  कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच हेड ऑफ  अकॅडमिक गव्हर्नन्स डाॅ. आर. एस. शेंडगे ,डायरेक्टर ऑफ  स्कूल ऑडिट  सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या शैला  दुबे, हेड मिस्ट्रेस निलम पडवळ यांनीही गुणवतं विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.

Leave a Reply