नव्याढंगात ज्योती पतसंस्थेची गगनभरारी – ॲड. रविंद्र बोरावके

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३: कार्पोरेट दर्जाची सेवा उपलब्ध करुन देत ज्योती  सहकारी पतसंस्थेच्या अद्यावत कामकाजाच्या माध्यमातून  राज्यातील सहकारी संस्थाना नवी दिशा देण्याचे काम करीत असुन पारदर्शक कामकाजाच्या जोरावर ज्योती सहकारी पतसंस्था राज्यात अव्वल ठरत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे मत संस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके यांनी व्यक्त केले.

 कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या मुख्यकार्यालय नुतन विस्तारीकरणाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नुकताच करण्यात आला. यावेळी ज्योती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, उद्योगपती कैलास ठोळे, पिपल्स बॅंकेचे माजी चेअरमन  सत्येन मुंदडा, गौतम बॅंकेचे माजी चेअरमन  सतिश कृष्णानी, 

पंकज लोढा, उत्तमराव औताडे, हरिभाऊ गिरमे ज्योती पतसंस्थेचे व्हा. चेअरमन कारभारी जुंधारे, संस्थेचे सरव्यवस्थापक सुरेश शिंदे, संचालक राजेंद्र बोरावके,  प्रभाकर  पाटील, मच्छिंद्र  पठाडे, महेंद्र  नवले,रविंद्र  राऊत, वाल्मिक भास्कर,देवराम सजन, दीपक गायकवाड, यशवंत आबनावे, वैशाली गिरमे, शितल आहेर, विनोद रांधवणे, किरण बोरावके, सहव्यवस्थापक सुनील क्षिरसागर, पल्लवी आढाव  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीयकृत बॅंकाना लाजवेल अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण  व्यवस्था निर्माण करुन ज्योती सहकारी पतसंस्थेने आपल्या मुख्य कार्यालयाचा कायापालट केला आहे.  या संदर्भात अधिक माहीती देताना  संस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके म्हणाले की, ज्योती सहकारी पतसंस्था हि गेल्या ३८ वर्षांपासून ग्राहकांच्यासेवे अविरत सज्ज आहे.दिवसेंदिवस संस्थेने पारदर्शक  कारभारातून सहकार क्षेञात आपलं अव्वल स्थान निमार्ण करुन राज्यातील इतर संस्थापुढे आदर्श निर्माण केला आहे. ग्राहकांच्या सुविधांचा विचार करुन संस्थेच्या मुख्यकार्यालयाचा अद्यावत विस्तार करीत आधुनिक तंञज्ञानाचे खासस्वरुप संस्थेला  दिले आहे. 

लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली हि संस्था आज तब्बल सव्वासातशे कोटीची उलाढाल केलीआहे.संस्थेकडे  ४३५ कोटींच्या ठेवी आहेत. पारदर्शक कामकाज व काटेकोर नियोजन असल्यामुळे येथील  ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षितता अधिक आहे. संस्थेच्या नावातच ज्योत असल्याने  येथे ग्राहकांच्या  सुखाची, यशाची  आणि विश्वासाची  ज्योत कायम तेवत असल्याने ज्योती सहकारी पतसंस्थेचे कार्य राज्यात लक्षवेधी ठरत आहे. बदलत्या काळाचा व नविन तंञज्ञानाचा विचार करुन ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी संस्थेचे मुख्यकार्यालय अद्ययावत केले आहे. संस्थेच्या आजवरच्या कार्यात संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक, शाखाअधिकारी, कर्मचारी,  दैनंदिनी जमाकर्ते, सभासद, ग्राहक व हितचिंकांचा मोलाचा सहभाग आहे असेही ते म्हणाले.

 दरम्यान  ज्योती सहकारी पतसंस्थेच्या अद्यावत कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेञातील मान्यवरांनी हजेरी लावून ज्योती पतसंस्थेच्या संपुर्ण यंञणेलाव चेअरम व्हा. चेअरमन संचालक, कर्मचाऱ्यांना  शुभेच्छा देवून अभिनंदन केले. ज्योती पतसंस्थेचे अद्यावत  मुख्य कार्यालय  सर्वांचे आकर्षण ठरले आहे.

Leave a Reply