शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व महात्मा गांधी जयंती दरम्यान भाजपाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवड्या निमित्त ठाकूर निमगाव ग्रामपंचायत व साईपुष हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधे उपचार करण्यात आले.
शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. ३०० पेक्षा अधिक गरजू रुग्णांच्याच्या तपासण्या झाल्यावर त्यांना मोफत औषधऊपचार करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नरेंद्र मोदीनी सुरू केलेले आयुष्यमान भारत, आधार कार्डचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी मोफत बूस्टर डोसचे देखील आयोजन करण्यात आले. गावातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवती व नवविवाहित मुलींची नावे मतदार यादीत नोंदणीच्या कागदपत्राची पूर्तता करण्यात आली. तसेच आमदार राजळे यांचे हस्ते पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थी विद्यार्थीनीना शालेय साहित्य वाटप, विविध स्पर्धेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.
प्रारंभी या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, साई पुष्प हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रल्हाद पाटील यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना विषयी माहिती दिली, डॉक्टर स्वरूप पाटील,नम्रता पाटील, रमेश औताडे यांचे पथकाने आरोग्य शिबीराचे काम पाहिले.
यावेळी बंडू रासने, महिला तालुका अध्यक्ष आशा गरड, श्रीकांत मिसाळ, निलेश ढाकणे, मुख्याध्यापक मुटकुळे, संतोष कंगणकर, सरपंच रामहरी घुले, शरद चाबुकस्वार, सचिन खंडागळे, गणेश धावणे, डॉ. महेश काळे, नारायण मडके, पंचक्रोशीतील ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच सुनिता कातकडे, भाजपाचे युवा नेते संभाजी कातकडे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कातकडे, आबासाहेब कातकडे, आशाबाई शिंदे,भाऊसाहेब शिंदे, व्हा चेअरमन रामनाथ फरताळे, शंकर हुंबे,ज्ञानदेव कातकडे, परमेश्वर निजवे, ज्ञानदेव कातकडे, दादासाहेब शिंदे, काकासाहेब कातकडे, भिमराज बळीद, पोपट बळीद,अरुण कातकडे, गोरख कातकडे, सुखदेव घावटे, जालिंदर निजवे, लक्ष्मण घोरपडे, रेवणन्नाथ खंडागळे,सखाराम कजबे,राजेंद्र बळीद, संतोष कातकडे,बबन खंडागळे,काकासाहेब निजवे, विष्णू फरताळे, नामदेव शिंदे, दशरथ कातकडे, महादेव कातकडे, संतोष हुंबे, निलेश बनसोडे, रामदास कातकडे,अशोक चव्हाण व इतर ग्रामस्थ मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.