तुमच्या विश्वासामुळेच समताचे नाव संपूर्ण आशिया खंडात उंचावले – काका कोयटे

समता पतसंस्थेचे ३७ वी वार्षिक सभा संपन्न

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ९९.४७ टक्के ठेवीदारांच्या १८ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड अंतर्गत सुरक्षित आहेत व उर्वरित ठेवेदारांच्या ठेवीदेखील सुरक्षित कर्ज वाटपामुळे सुरक्षित आहे. तुमच्या ठेवींना सुरक्षितता आम्ही प्रदान केली असून तुमच्या विश्वासामुळेच समता नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर आशिया खंडात उंचावले असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी समता पतसंस्थेच्या ३७ व्या वार्षिक सभे प्रसंगी दिली.

Mypage

     याप्रसंगी सभासदांना १२ % डिव्हीडंट देखील देण्याची ही घोषणा केली. याबाबत अधिक बोलताना म्हणाले की, समता पतसंस्थेने आतापर्यंत २५ टक्के पासून ५० टक्के पर्यंत डिव्हीडंट सभासदांना दिलेला आहे. त्यामुळे सभासदांनी आपले अधिकाधिक गुंतवणूक संस्थेच्या भागभांडवलामध्ये करावी. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभा २३  सप्टेंबर २०२२ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात संपन्न झाली. या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद भाई पटेल यांनी केले.

Mypage

  सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी केले.संस्थेबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले की, संस्थेच्या ठेवी ७१० कोटी ८९ लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत तर कर्ज वाटप ५४७ कोटी ८८ लाख रुपये पर्यंत आहे. या कर्जापैकी ४० टक्के म्हणजे २१५ कोटी कर्ज हे सोनेतारण कर्ज आहे. सोनेतारण कर्जात कोणत्याही प्रकारचा अपहार होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोनेतारण कर्ज वाटप १००% सुरक्षित केले आहे. त्यामुळे कर्ज वसुलीमध्ये देखील समता पतसंस्था राज्यात अव्वल आहे. समता पतसंस्थेमध्ये अत्युच्च  तंत्रज्ञानाचा वापर तसेच उच्च दर्जाची ग्राहक सेवा देऊन ठेवीदार व कर्जदारांमध्ये समता पतसंस्थेने आकर्षण निर्माण केले आहे.

Mypage

    प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ सभासद चांगदेव वक्ते,माधव वहाडणे,दिपक इंगळे,नरेंद्र ललवाणी, नंदकिशोर परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, समता पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटातील सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे समता पतसंस्थेत आमच्या सोबतच सर्वच ठेवीदार विश्वासाने समतात ठेवी ठेवत आहोत.

Mypage

      तसेच संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या ३६ देशांचे नेतृत्व करणाऱ्या एशियन कॉन्फिडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) वर संचालक आणि खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Mypage

    सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेने १ वर्षांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे समता पतसंस्थेची सक्सेस स्टोरी दाखविली होती. समताची सक्सेस स्टोरी आणि पतसंस्था चळवळीतील योगदानाचा अभ्यास केला आणि आशिया खंडातील सर्व देश माझ्या कामावर प्रभावित झाले आणि माझी निवड लोकशाही पद्धतीने झाली. हे यश संस्थेच्या सर्व सभासदांना समर्पित करतो.

Mypage

       या वार्षिक सभेला समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, गुलाबचंद अग्रवाल, जितेंद्र शहा,अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे,निरव रावलिया,कचरू मोकळ, राजकुमार बंब,बाबासाहेब जंगम, सरव्यवस्थापक सचिन भट्टड तसेच संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार सचिन भट्टड यांनी मानले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *