कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील पोहेगांव देर्डे को-हाळे रस्त्यावरील खडकीनाल्यावरील पुल पावसाच्या पाण्याने व नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग निर्मीतीच्या वाहतुकीमुळे खचला होता त्यामुळे या परिसरातील शालेय मुला मुलींना तसेच अन्य प्रवाशांना वाहतुकींस मोठी अडचण तयार झाली होती.
त्यासाठी माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तहसिलदार विजय बोरूडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यास यश आले असुन नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग निर्मीतीच्या अधिका-यांशी युवानेते विवेक कोल्हे यांनी संपर्क साधुन त्याची दुरूस्ती करून घेतली त्याबददल परिसरातील पोहेगांव, देर्डे को-हाळे, व पंचकोशतील नागरिकांनी आभार मानले आहे.
याबाबतची माहिती अशी की, नव्याने नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग तयार करण्यांच्या कामासाठी मुरूम, माती, डबर आदि साहित्याची ने आण करण्यांसाठी पोहेगांव देर्डे को-हाळे पंचक्रोशीत मोठ मोठया डंपर मार्फत वाहतुक सुरू आहे. त्यातच चालु वर्षी पावसाळयाची तीव्रता वाढल्यांने या परिसरातील पोहेगांव देर्डेको-हाळे रस्त्याच्या मध्ये असलेल्या खडकी नाल्यावरील पुल नादुरूस्त झाला. त्यांच्या अंतर्गत नळया गाळामुळे पुर्णपणे बंद झाल्या परिणामी या पुलावरून पावसाचे पाणी वाहत होते, त्यामुळे या परिसरातुन तालुक्याच्या व अन्य ठिकाणी तसेच शालेय महाविद्यालयीन शिक्षण घेण्यांसाठी ये जा करणा-या मुला मुलींची अडचण तयार झाली.
त्याबाबत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांनी या रस्त्याची अडचण प्रामुख्याने जाणून घेत त्याच्या दुरूस्तीसाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्फत मोठया प्रमाणांत पाठपुरावा केला व सदरचा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यांत आला याप्रसंगी माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांच्यासह पंचकोशीतील सर्वश्री. राजेंद्र गवळी, भाउसाहेब डुबे, आण्णासाहेब कोल्हे, राजेश डुबे, राजेंद्र गव्हाणे, विठठल डुबे, प्रशांत शिलेदार, रविंद्र गव्हाणे, रामनाथ डुबे, संदिप डुबे आदि उपस्थित होते.