जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांचा जोहरापूरकरानी केला सन्मान

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : सध्या धुळे येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले गुलाबराव खरात यांची पदोन्नती होवून आयएएस केडर मध्ये निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल शनिवारी तालुक्यातील जोहरापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबर ही संवाद साधला.

      खरात यांचे वर्गमित्र प्रा.अप्पासाहेब काकडे, मधूकर पालवे तसेच संजय खेडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी रामायणचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे, भाऊराव वीर क्रीडा अधिकारी मुंबई, उपप्राचार्य प्रा. डॉ. अण्णासाहेब काकडे, दिनकरराव बडधे, विठ्ठलराव उगलमुगले, रोहन लांडे, सेवा सोसायटीचे चेअरमन एकनाथ ढगे, प्राचार्य भाऊसाहेब विधाटे,  राजेंद्र  काकडे, रमेश बडधे, ताराचंद घुटे, जनार्दन देवढे, सचिन लांडे, बापूसाहेब लांडे कमलेश सरोदे जोहरापूर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रवीण काकडे यांनी प्रास्ताविक केले. केली तर अशोक उगलमुगले यांनी आभार मानले.