तालुक्यातील रखडलेल्या १५.७५ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा – आ. राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगांव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाचे विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत सप्टेंबर २०१९ मध्ये रु. १० कोटीच्या कामांना मंजूरी दिली होती. मात्र त्यानंतर मागील सरकारच्या कालावधीत या कामास स्थगिती देण्यात आली. त्याचबरोबर अर्थसंकल्प २०२२ मध्ये रु. ५ कोटी ७५ लक्ष किंमतीच्या कामांना मंजूरी मिळाली होती.

याप्रमाणे रु. १५ कोटी ७५ लक्ष किंमतीच्या कामांना नव्याने सुरुवात होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे  पाठपुरावा केल्यामुळे आता या कामांची नव्याने सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

       या कामांची ताताडीने निविदा प्रक्रिया करुन कामे सुरु होणार आहेत. यामध्ये विशेष दुरुस्ती अंतर्गत आव्हाणे-मळेगांव-भातकुडगांव-रांजणी- घेवरी रस्ता रु. १ कोटी. खुंटेफळ-ताजनापुर-बोडखे-एरडगांव रस्ता रु. १ कोटी ‘, निंबे-वाघोली-वडूले-भगुर रस्ता रु. २ कोटी, . तिसगांव-शेवगांव-पैठण रस्ता रु. २ कोटी ७५ लाख., चापडगांव-प्रभुवाडगांव-खामपिंप्री-मुंगी रस्ता रु. २५ लाख, शेवगांव-वरुर-सुसरे-पिंपळगांवटप्पा-अकोले रस्ता रु. ३ कोटी त्याचबरोबर अर्थसंकल्प २०२२ श्रीरामपुर-नेवासा-शेवगांव-गेवराई रस्ता रु. १ कोटी, रामा-५० ते चापडगांव-हातगांव रस्ता रु. २ कोटी ३७ लाख, चापडगांव-हातगांव-कांबी ते जिल्हा हद्द रु. २ कोटी ३७ लाख  या कामांचा समावेश आहे. 

      मागील दोन वर्षापासून अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे रस्ते वाहतूकीसाठी अत्यंत खराब झालेले आहेत.  गेल्या ३ महिन्यात राज्य शासनाकडून या कामांसाठी पुरवणी अर्थ संकल्प २०२२ मध्ये रु. ५० कोटी तसेच २५ /१५ अंतर्गत रु. ५ कोटी व आता रु. १५ कोटी ७५ लाख खर्चाच्या रस्त्यांच्या कामाला निधी मिळाला आहे, मतदारसंघातील उर्वरित मुख्य रस्ते तसे गाव रस्त्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा असल्याचे आमदार राजळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन तसेच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.