कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव मतदार संघात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य त्यामुळे १००% भरलेल्या निळवंडे धरणातून निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत व कालव्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेतली.
कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव गटातील बहुतांश गावे व राहाता तालुक्यातील ११ गावे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येत आहेत. चालु वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे नागरिकाच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. अशा वेळी प्रशासनाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गावो गावी टँकर सुरु करावे लागणार असून त्यामुळे प्रशासनावर आर्थिक बोजा देखील पडणार आहे.
परंतु यावर्षी कोपरगाव मतदार संघात जरी पाऊस कमी झाला असला तरी निळवंडे मात्र १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे या धरणातून डाव्या कालव्याला वेळीच पाणी सोडून लाभक्षेत्रातील गावांचे बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेतले तर प्रशासनाचा त्रास कमी होवून टँकर सुरु करण्याची वेळ टाळता येवू शकणार आहे. तसेच निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून ज्या ठिकाणी काम सुरु आहे त्या कामाला गती देण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत दिल्या.
त्यासाठी निळवंडे डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुका व मतदारसंघाच्या लाभक्षेत्रातील गावांचे बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव भरून द्या. धनगरवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगच्या पुढील काम संथ गतीने सुरु असलेल्या कामाला गती देवून हे काम तातडीने पूर्ण करा. वाकडी -श्रीरामपूर रस्त्यावरील पुलाचे काम त्वरित सुरु करून रेल्वे बोगद्याजवळ काँक्रीटीकरण करून रक्टे वस्तीजवळ पूल तयार करावा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणीला आजच सुरुवात करून कामाचा वेग वाढवू व कालव्याला लवकरात लवकर लवरकरच पाणी सोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली आहे.
यावेळी निळवंडे डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, सहाय्यक अभियंता विवेक लव्हाट, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, काकासाहेब जावळे, के.डी. खालकर, नंदकिशोर औताडे, किसनराव पाडेकर, कौसरभाई सय्यद, भारत पवार, ज्ञानेश्वर गव्हाणे, सुभाष ढवळे, गजानन मते, सोपान वाघ, गोपीनाथ रहाणे, बाबासाहेब वाघ, सुरेश वाघ, मच्छिन्द्र पाटील, बाबासाहेब वाघ, रेवणनाथ वाघ, अण्णासाहेब वाणी, बाळासाहेब वाघ, सुनिल वाघ, शशिकांत सिनारे, संजय वाघ, सुधीर वाघ, रूपेश गायकवाड,
संभाजी तनपुरे, दिलीप वाघ, रविंद्र गायकवाड, विकास वाघ, सुभाष वाघ, सतिश वाघ, अविनाश वाघ, योगेश रक्टे, अनिल रक्टे, लक्ष्मण राहिंज, विजय काटेकर, साहेबराव कांडेकर, गोकुळ कांडेकर, रामनाथ पाडेकर, राधकीसन कोल्हे, संतोष वर्पे, दत्तात्रय खकाळे, आत्याभाऊ वर्पे, साहेबराव रहाणे, संदीप रहाणे, रवींद्र वर्पे, सचिन खकाळे, अनिल वर्पे, सोमनाथ रहाणे, सोमनाथ वर्पे, कचेश्वर रहाणे, प्रमोद गुडघे, ज्ञानदेव गव्हाणे, संदीप गोर्डे, सिकंदर इनामदार, नानासाहेब शेंडगे आदी उपस्थित होते.