कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पढेगाव, ओगदी गावातील नागरिकांचा मागील काही अनेक वर्षापासून अनुत्तरीत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पढेगावला जलजीवन मिशन योजने अंतर्गत ५४.८१ लाख व ओगदीसाठी ५७.०१ लाख रुपये निधी मिळवून दिला आहे. या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या ९.६५ लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा सोडवावा अशी प्राधान्याने मागणी येत होती. त्या मागणीची दखल घेवून २०१९ पासून आजतागायत २६० कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनांना दिला आहे.
या निधीतून काही योजनांचे काम पूर्ण झाले असून अनेक योजनांचे काम प्रगतीपथावर असून अजूनही काही गावांचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असून त्या गावांचे देखील पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारभारी आगवण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, पं. स. माजी उपसभापती अर्जुनराव काळे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, दिलीप दाणे, उपसरपंच मनोज शिंदे, संतोष शिंदे, बाबासाहेब शिंदे, भानुदास शिंदे, किरणजी शिंदे, सांडूभाई पठाण, एकनाथजी शिंदे, ओगदीचे उपसरपंच सोमनाथ जोरवर, गणेश गोणटे, बाळासाहेब भालेराव, सुरेश जोरवर, रत्नाकर भालेराव, संजय भालेराव, मच्छिन्द्र जाधव,
बाळासाहेब कासार, विजय कदम, केदारनाथ वाघ, अंबादास शिंदे, अशोक गोल्हार, शंकरजी सुंभे, प्रकाश मलिक, डॉ. कृष्णा मलिक, अखिलेश भाकरे, शिवाजी शिंदे, भाऊसाहेब मापारी, रामनाथ कदम, भाऊसाहेब शिंदे, वसंत शिंदे, रविंद्र शिंदे, मारुती शिंदे, माधवराव शिंदे, रमेश शिंदे, रामदास शिंदे, पं.स. उपअभियंता सी.डी. लाटे, शाखा अभियंता अश्विन वाघ, ठेकेदार दिपक देशमुख शांताराम चंदन, भागीनाथ जाधव, योगेश करवर, पुंडलिक जोरवर, संजय गोणटे, चांगदेव गोणटे,
बाळू कोल्हे, तान्हाजी करवर, रामेश्वर बिन्नर, रमेश भालेराव, सुनील टोरपे, जगन जोरवर, भास्कर गोणटे, रामेश्वर जोरवर, बाबासाहेब ठोंबरे, गणेश सदगीर, प्रविण भालेराव, रतन जोरवर, राजेंद्र भालेराव, ताराचंद चंदन, बाबासाहेब जोरवर, निवृत्ती सावंत, पुंडलिक जोरवर, राहुल शिंगाडे, शंकर फाफाळे, अण्णा जोरवर, विनायक जोरवर, मनोहर खैरनार, निवृत्ती पोळ, संजय पोळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.