शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : करोनाच्या महामारीत आपला जीवनसाथी गमावल्याने निराधार झालेल्या एकल महिलांवर दुखाचा डोंगर कोसळला अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन व करोंना एकल महिला पुनर्वसन समिति शेवगाव यांच्या वतीने तालुक्यातील निराधार एकल महिलाना मोफत शिलाई मशीन व पिको फॉल मशीनचे वितरण आज आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आ. राजळे बोलत होत्या. आ. राजळे म्हणाल्या, येथील सामाजीक कार्यकर्त्यांनी निराधार एकल महिलाना मोफत शिलाई मशीन व पिको फॉल मशीनचे वाटप करून समाजा पुढे आदर्श ठेवला आहे. इतरांनी सुद्धा अशी स्फूर्ति घ्यावी.
यावेळी तहसिलदर छगनराव वाघ, सहायक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, सुरेश पाटेकर , बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडधे , स्टेट बँकेचे व्यवस्थापक पवन साह , सहायक व्यवस्थापक प्रमोद डाके , एकल महिला पुनर्वसन समितीचे अमोल घोलप , कारभारी गरड ,चंद्र्कांत महाराज लबडे , उमेश घेवरीकर, दत्ता गवते , डॉ. मनीषा लड्डा, माजी नगर सेवक महेश फलके, सागर फलके सुनील रासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, सुनील काकडे , आशाताई गरड, अशोक शिंदे, गणेश कोरडे , प्रवीण भारस्कर सचिन शिनगारे, आदींची प्रमुख उपस्थीती होती.
शेवगाव तालुक्यात २४७ एकल महिलांची नोंदणी झाली असून त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, घरकुल तसेच अन्य योजनाचा लाभ मिळावा त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळण्या बाबत येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांना विविध सवलतीच्या योजनांची माहिती मिळावी या साठी शासनाच्या स्तरावरून प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात यावेत त्या साठी आमदार व संबधित शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी या वेळी एकल माहिलांच्या वतीने करण्यात आली. दीपक कुसळकर यांनी सूत्र संचालन केले तर अमोल घोलप यांनी आभार मानले.