नकुल गव्हाणे राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्यातील अंजनापुर येथील नकुल अशोक गव्हाणे  यांना त्यांच्या उद्योग व्यवसायाची दखल घेऊन अहमदनगर येथील शेतकरी पुत्र फाउंडेशन, या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड २०२२  राज्यस्तरीय  युवा उद्योजक या पुरस्काराने  अहमदनगर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. बिजमाता पद्मश्री  राहीबाई पोपेरे यांच्याहस्ते व आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.

 शेतकरी पुत्र फाउंडेशनकडून यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा नुकताच  अहमदनगर येथील रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात कृषी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक इतर क्षेत्रातील मान्यवरांना नॅशनल ग्रेट अचिवर्स अवॉर्ड २०२२ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कंपनीत नोकरी करत असतांनीही उद्योगव्यवसायात  लक्ष देत त्यात अतिशय कमी कालावधीत उल्लेखनीय काम केल्याने नकुल गव्हणे  यांना युवा उद्योजक या राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.    

 यावेळी शेतकरी पुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत  शेळके, उपाध्यक्ष कृष्णा पाठक, सचिव रोहन ढेरे, सहसचिव सौरभ निकम, सल्लागार ऋषिकेश पाठक, खजिनदार शुभम सुद्रिक, नेवासा युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष किशोर भणगे, ठेकेदार कैलास राऊत, व्हामसोचे परीसर व्यवस्थापक प्रतिक वर्पे तसेच पुरस्कारार्थी शेतकरी बांधव उपस्थित होते.