शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांना अमेरिकेच्या ग्लोबल ह्यूमन राईट कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचा ‘एशिया पॅसिफीक आयकॉनिक अवार्ड’ हा पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ११ डिसेंबर २०२२ ला सायंकाळी सातला बँकॉक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ग्लोबल ह्यूमन राइट्स कौन्सिल फॉर पीस अँड सस्टेनबल डेव्हलपमेंट या संस्थेचे चेअरमन डॉ .साल्हटोर मोकिया यांनी गेल्या १६ नोव्हेंबरला डॉक्टर भालेराव यांना पत्र पाठवून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकॉक ला येण्यासाठी निमंत्रीत केले आहे.
देशातील नऊ राज्यात तब्बल १२७ शाखांच्या विस्ताराद्वारे बँकिंग व्यवस्थापन क्षेत्रात निष्ठापूर्वक केलेल्या विशेष कामगिरीची तसेच विविध सामाजिक क्षेत्रात अर्थतज्ञ डॉ. भालेराव सातत्याने करत असलेल्या समाज उपयोगी कार्याची दखल या संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने घेतली असल्याचे नमूद करुन डॉ. भालेराव यांची ही उत्तुंग कामगिरी समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणादायी व स्फुर्तीदायक ठरत असल्याचे कौतूक देखील चेअरमन डॉ. मोकिया यांनी केले आहे.