राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत शिबीराचा उत्साहात शुभारंभ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दक्षिण नगर, आयोजित हेमंत (हिवाळी ) शिबिराचा शुभारंभ काल शुक्रवारी (दि. २३ )  येथील शेवगाव पाथर्डी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ नगर मध्ये सद्गुरु जोग महाराज संस्थानचे प्रमुख हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते  उत्साहात कारण्यात आला.

      याप्रसंगी  शिबीर अधिकारी चंद्रकांत काळोखे, शिबीर कार्यवाह रणजीत सुराणा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा कार्यवाह वाल्मिकराव कुलकर्णी , यांचे सह अमोल आगाशे, पी. डी. कुलकर्णी, वेदक केळकर, अनुप कुलथे, ज्येष्ठ स्वयंसेवक जगदीश धूत, डॉ. नीरज लांडे पाटील, डॉ. कृष्णा देहाडराय व जिल्हयाच्या विविध भागातून आलेले बाराशे शिबीरार्थी उपस्थित होते.

       यावेळी राम महाराज झिंजुर्के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा गौरव करून बालपणापासूनच प्रेत्येकाच्या मनात देशभक्ती आणि हिंदू धर्माचे प्रेम निर्माण करण्यासाठी या शिबिराचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

     जिल्हा सहकार्यवाह दिनेश करंडे  यांनी शिबीराची सविस्तर  माहिती दिली.ज्या प्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सिमेचे रक्षण करतांना कडाक्याची थंडी, ऊन, वारा, पाऊसाची परवा न करता देशाचे रक्षण करतात त्याचीच अनुभूती घेण्यासाठी या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना बालपणतच राहुट्या मंध्ये राहून थंडी व ऊन याचा सामना करत, शिस्त आणि देशभक्तीचे धडे देण्यात येतात. आलेले सर्व स्वयंसेवक  तसेच त्यांचे बौद्धिक घेणारे शिक्षक हे देखील स्वतःची पदरमोड करून शिबिरात सहभागी झाले आहेत .झ्यता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना येथे बौद्धिके देणार देण्यात येणार असून पहाटे पाच ते रात्री साडेनऊ पर्यंत सलग कार्यक्रमाचे आयोजन आहे.

यात ध्यानमंत्र, योगासने, प्राणायाम ,कवायत ,मैदानी खेळ, युद्ध अभ्यास, आणि विविध विषयावर  तज्ञांचे मार्गदर्शन, खेळाच्या स्पर्धा, शाखा लावण्याचे व घोषवाक्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिविरार्थींची वयोगटानुसार ४० राहुट्या मध्ये निवासाची सोय केली आहे. शिबिरार्थींच्या भोजनासाठी पंचक्रोशीतील गावातून घरटी दहा चपात्या येत आहेत . चपात्या पाठविण्यासाठी अनेक गावानी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला आहे. भाज्या, वरण-भात येथेच करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.

         या शिबिरात दक्षिण नगर जिल्ह्यातून एकूण १२०० स्वयंसेवक सहभागी झाले असून या स्वयंसेवकांची व्यवस्था पहाण्यासाठी शेवगाव तालुक्यातील शेकडो स्वयंसेवक गेल्या महिन्यापासून राबत आहेत. येथील उघड्या माळरानावर दहा एकर जागेत  राजमाता जिजाऊ नगर हे ४० राहूट्यांचे छोटेखानी गावच वसविण्यात आले आहे. उद्या रविवारी दुपारी ४ ते ६ शेवगावच्या मुख्य रस्त्यावरून संपूर्ण गणवेशात पथसंचालन होणार असून त्यानंतर शिबीर स्थळी समारोप संपन्न होणार आहे.

यावेळी सर्व शाखांचे शारीरिक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. व्यंकटेश मल्टीस्टेटचे संस्थापक अविनाश शिंदे प्रमुख वक्ते म्हणून तर महाराष्ट्र प्रांताचे बाल विभाग प्रमुख दीपकजी काळे यांचे सह जिल्ह्यातील विविध स्तरातील सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या समारोप प्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थाप्रमुख हरीश शिंदे व राम देहाडराय  यांनी केले आहे.